Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा चवदार सिंगाडा पुरी, नोट करा रेसिपी

Navratri 2024: नवरात्रीत उपवासाला सकाळी नाश्त्यात सिंगाडा पुरी बनवू शकता. ही पुरी बनवणे खुप सोपी असून कमी वेळेत तयार होते.
Navratri Fast Recipe:
Navratri Fast Recipe: Sakal
Updated on

Navratri Fast Recipe: शारदीय नवरात्री सुरू होऊन 5 दिवस पुर्ण झाले आहे. नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात. नवरात्रीत सकाळी नाश्त्यात स्वादिष्ट आणि आरोग्यदायी शिंगाडा पुरी बनवू शकता. यात अनेक पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. तसेच शिंगाडा पुरी बनवणे खुप सोपे असून लवकर तयार होतात. चला तर मग जाणून घेऊया शिंगाडा पुरी बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

सिंगाडा पुरी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

सिंगाडा पीठ

जिरं

सैंधव मीठ

हिरवी मिरची

तेल

Navratri Fast Recipe:
Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा स्वादिष्ट अन् कुरकुरीत 'Banana Kofta' नोट करा रेसिपी

सिंगाडा पुरी बनवण्याची कृती

मध्यम आकाराचे सिंगाडा पाण्यात चांगले स्वच्छ धुवा. नंतर कुकरमध्ये वाफवून घ्यावे.

नंतर थंड करायाला एका प्लेटमध्ये काढा.

नंतर हाताने मॅश करावे.

त्यात भांड्यात सिंघाडा पीठ घ्यावे.

नंतर त्यात जिरं पावडर आणि सैंधव मीठ मिक्स करा.

नंतर हिरव्या मिरच्या टाकून मिक्स करा.

थोडे पाणी मिक्स करा.

पीठ चांगले मळून घ्यावे.

नंतर छोटे गोळे करून पुरी करावी.

एका पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवावे.

एक एक पुरी सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावे.

सिघांडा पुरीसोबत दही खाऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.