Navratri Fast Recipe: नवरात्रीत नवव्या दिवशी सकाळी नाश्त्यात झटपट बनवा राजगिरा आणि साबुदाणा डोसा, लगेच नोट करा रेसिपी

Navratri 2024 Fast Recipe: नवरात्रीत शेवटच्या दिवशी डोसा खायची इच्छा असेल तर राजगिरा आणि साबुदाण्यापासून स्वादिष्ट डोसा बनवू शकता.
Navratri 2024 Fast Recipe
Navratri 2024 Fast RecipeSakal
Updated on

Navratri 2024 Fast Recipe: शारदीय नवरात्रीला 3 ऑक्टोबरपासून सुरूवात झाली. आज नवरात्रीचा नववा दिवस आहे. तसेच अष्टमी आणि नवमी देखील साजरी केली जात आहे. नवरात्रीत नऊ दिवस माता दुर्गेच्या नऊ रूपांची मनोभावे पूजा केली जाते. मान्यतेनुसार माता दुर्गेची पूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात.

नवरात्रीत सकाळी नाश्त्यात डोसा खायची असेल तर राजगिरा आणि साबुदाणा डोसा बनवू शकता. राजगिरा आणि साबुदाणा डोसा बनवणे खुप सोपे असून लवकर तयार होते. चला तर मग जाणून घेऊया राजगिरा आणि साबुदाणा डोसा बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय आहे.

राजगिरा आणि साबुदाणा डोसा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

100 ग्रॅम - राजगिरा पीठ

200 ग्रॅम - साबुदाणा

50 ग्रॅम- दही

500 ग्रॅम - उकडलेले बटाटे

आवश्यकतेनुसार तूप

चिमूटभर काळी मिरी

चिरलेली कोथिंबीर

हिरवी मिरची

लिंबाचा रस

मीठ

राजगिरा आणि साबुदाणा डोसा बनवण्याची कृती

राजगिरा आणि साबुदाणा डोसा बनवण्यासाठी सर्वात पहिले साबुदाणा रात्री किंवा पहाटे पाण्याने धुवून भिजवावा. ४-५ तासांनी दही घालून मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. त्यात राजगिरा पीठ पण घालावे. मीठ घालून डोसा पिठाप्रमाणे तयार करावे. बटाटे सोलून मॅश करा. कढईत तूप गरम करून जिरे तडतडून त्यात मीठ आणि मिरपूड घालून मिश्रण तयार करा. लिंबाचा रस घाला आणि आता पॅन गरम करा. तूप लावून त्या मिश्रणाचा डोसा बनवा आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या. त्यावर बटाट्याचे मिश्रण ठेवा आणि त्यांना गुंडाळा आणि राजगिरा पीठ आणि साबुदाणा बनवलेले हेल्दी डोसा सर्व्ह करा.

Related Stories

No stories found.