Navratri 2024 : वरीचा भात, खिडचीची चव वाढवेल उपवासाची दाण्याची आमटी, रेसिपी पण लगेचच होणारी

प्रत्येकाकडे एकदातरी वरीचा भात अन् त्यावर घेता येईल अशी शेंगदाण्याची आमटी बनवली जाते.
Navratri 2024
Navratri 2024esakal
Updated on

Navratri 2024 :

नवरात्रीचे उपवास सुरू आहेत. त्यामुळे घरी उपवासाच्या पदार्थांची रेलचेल सुरू असेल. नवरात्रीत काही लोक फराळ करून उपवास करतात. तर काही लोक कडक उपवास करतात. नवरात्रीचे उपवास आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाचे आहेत. (Vrat Recipe)

व्रतामध्ये खाता येतील असे अनेक पदार्थ आपण बनवतो. प्रत्येकाकडे एकदातरी वरीचा भात अन् त्यावर घेता येईल अशी शेंगदाण्याची आमटी बनवली जाते. ही शेंगदाण्याची आमटी कशी बनवायची हे पाहुयात. (Navratri 2024)

Navratri 2024
Navratri Special Recipe : नवरात्रीच्या चौथ्या दिवशी ट्राय करा झटपट बनणारा बटाट्याचा पराठा

साहित्य :

१ वाटी खमंग भाजून सालं काढलेले दाणे, ४ ते ५ हिरव्या मिरच्या, पाव चमचा जिरे वाटून, २ ते ३ अमसुले, चवीनुसार मीठ व गूळ, १ टे. स्पून वनस्पती किंवा साजूक तूप, पाव चमचा जिरे, मूठभर बारीक चिरलेली कोथिंबीर

Navratri 2024
Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी नाश्त्यात बनवा फ्रूटसॅलड, दिवसभर राहाल उत्साही

कृती :

भाजून सोललेले दाणे पाणी घालून बारीक वाटावेत. वाटताना त्यात ३ वाट्या पाणी घालावे व पाण्यातच बारीक वाटावेत.

वाटलेल्या दाण्यांत तिखट किंवा वाटलेली मिरची, मीठ, अमसुले, गूळ घालून आमटी उकळायला ठेवावी. चांगली उकळली की १ चमचा तुपाची जिरे घालून खमंग फोडणी आमटीवर द्यावी.

कोथिंबीर घालून उतरवावी, वऱ्याच्या तांदुळाबरोबर साबुदाण्याच्या खिचडीबरोबर खाण्यास द्यावी.

Navratri 2024
Navratri Recipe :  डोसा,थालीपिठाची चव वाढवणारी उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची माहितीये का?

दाणे अगदी बारीक वाटावेत, नाहीतर दाण्याचे जाड कूट खाली बसून आमटी चोथापाणी होते.

दाणे वाटताना पाण्याच्याऐवजी २ वाट्या ताक घातले तरी आमटीला सुरेख चव येते. ताक घातले तर अमसुले घालायची गरज नाही.

दाण्याची आमटी काही लोकांना पित्तकर वाटते. म्हणून चवबदल म्हणून केली तरी खूप दाट करू नये. पातळसर ठेवावी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.