उद्या घटस्थापना होणार असून प्रत्येक देवाचे नवरात्राला सुरूवात होणार आहे. महाराष्ट्रात घटस्थापना प्रत्येक घरात केली जाते. घटस्थानपेसोबत घरा-घरात देवांचे नवरात्र असते. नवरात्रोत्सवाच्या काळात कुलदेवता, ग्रामदेवतेचे नवरात्रही असते. या काळात लोक व्रतस्थ राहतात. (Navratri vrat recipe)
देशभरात नवरात्र वेगवेगळ्या पद्धतीने साजरे करत असतात. नवरात्रीच्या काळात उपवास करणाऱ्या महिलांना ९ दिवस उपवास करावा लागतो. या काळात केवळ व्रतामध्ये खाल्ले जातील असे पदार्थच खाल्ले जातात. व्रत वैकल्यात खिचडी, वरीचे पदार्थ जास्त खाल्ले जातात.
तुम्हीही यंदाच्या नवरात्रीत उपवास करणार असाल. तर, उपवासाची बटाट्याची भाजी कशी बनवायची हे पाहू शकता. तुम्ही ही भाजी डोसा, थालीपिठ याच्यासोबतही खाऊ शकता.
साहित्य :
अर्धा किलो बटाटे उकडून, सोलून, ५ ते ६ हिरव्या मिरच्या, पाव इंच आले वाटून, अर्धा टी स्पून जिरे वाटून, पाव वाटी दाण्याचे कूट, एक वाटी खोवलेला नारळ, मूठभर चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ व साखर, २ टे. स्पून तूप व अर्धा टी स्पून जिरे अर्धा चमचा लिंबाचा रस.
कृती :
उकडलेले बटाटे घेऊन त्याच्या चौकोनी फोडी कराव्यात. त्याला वाटलेली मिरची, आलं आणि जिरे लावावे. पसरट कढईत दोन टे. स्पून तुपाची अर्धा चमचा जिरे घालून फोडणी करावी. त्यात बटाट्याच्या फोडी घालाव्यात.
चवीनुसार मीठ व साखर घालून भाजी परतून एक वाफ येऊ द्यावी. दाण्याचे कूट, ओला नारळ, कोथिंबीर घालावी. अर्ध्या लिंबाचा रस घालावा. भाजी खमंग परतून खाली उतरवावी. (Navratri special recipe)
ही भाजी उकडलेल्या बटाट्यांऐवजी कच्च्या बटाट्यांच्या पातळ काचऱ्या करून तूप-जिऱ्याच्या फोडणीवर शिजवून मीठ, दाण्याचे कूट, साखर घालून परतून घ्यावी. परतून केलेली भाजी चांगली लागते.
उकडलेल्या बटाट्यांच्या फोडींना फोडणी न घालता वाटलेली हिरवी मिरची, मीठ, साखर, दीड वाटी खोवलेला नारळ, १ लिंबाचा रस, दाण्याचे कूट, कोथिंबीर घालून हलक्या हाताने कालवून केलेली भाजी चविष्ट लागते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.