Navratri Recipe : नवरात्रीचा उपवास! सोप्या पद्धतीने घरी बनवा पौष्टिक उपवासाची खांडवी

Navratri Recipe : नवरात्रीच्या उपवासात तुम्हाला उपवासाची खांडवी खाता येईल याची सोय आम्ही करणार आहोत. त्यासाठी तुम्ही उपवासाची खांडवी कशी बनवायची हे पाहुयात.
Navratri Recipe
Navratri Recipeesakal
Updated on

Navratri Recipe :

आपल्याकडे ताट वाढण्याची एक पद्धत असते. ज्यात चपाती,भाजी,भात आमटी या मुख्य पदार्थांसोबत काही तोंडी लावले जाणारे पदार्थ बनवले जातात. ज्यामध्ये आळू वडी, पाट वडी, कोरड्या चटण्या यांचा समावेश असतो. वडी या प्रकारात बनवला जाणारा खांडवी हा पदार्थही लोकप्रिय आहे.

खांडवी हा गुजरातमधील लोकप्रिय पदार्थांपैकी एक आहे. हा पदार्थ दिसायला जितका सुंदर आहे चविलाही तितकाच स्वादिष्ट आहे. पण आपण जी गोड खांडवी बनवणार आहोत ती गोड आहे. (Navratri Special Vrat Recipe)

Navratri Recipe
Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी नाश्त्यात बनवा फ्रूटसॅलड, दिवसभर राहाल उत्साही

असा हा पदार्थ तुम्ही उपवासाला खाल्ला तर नाही चालणार. नवरात्रीच्या उपवासात तुम्हाला उपवासाची खांडवी खाता येईल याची सोय आम्ही करणार आहोत. त्यासाठी तुम्ही उपवासाची खांडवी कशी बनवायची हे पाहुयात.

साहित्य : (Vrat Khandvi Ingredient)

वाटीभर स्वच्छ निवडलेले वऱ्याचे तांदूळ, पाऊण वाटी चिरलेला गूळ, अर्धी वाटी साखर, ५ ते ६ वेलदोड्यांची पूड, १ वाटी खोवलेला नारळ, २ टे. स्पून साजूक तूप.

Navratri Recipe
Navratri Recipe: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी बनवा कुरकुरीत उपवासाचे रोल, नोट करा रेसिपी

कृती : (Navratri Special Vrat Recipe Khandvi)

वऱ्याचे तांदूळ स्वच्छ धुऊन निथळत ठेवावेत. जाड बुडाच्या पातेलीत साजूक तूप गरम करून धुतलेले वऱ्याचे तांदूळ त्यात घालून गुलाबी रंगावर परतावेत. त्यावर दीड वाटी आधणाचे पाणी घालून झाकण ठेवून दोन वाफा द्याव्यात.

वऱ्याचे तांदूळ शिजले की, त्यात चिरलेला गूळ, साखर व वेलदोड्याची पूड घालावी. चांगले ढवळून झाकण ठेवून दोन वाफा द्याव्यात.

Navratri Recipe
Sunday Special Recipe: रविवार आरोग्यादायी बनवायचयं? मग सकाळी नाश्त्यात बनवा 'हाय प्रोटीन सॅलड', जाणून घ्या रेसिपी

थाळीला तूप लावून शिजलेल्या तांदळाच्या जाडसर वड्या पाडाव्यात. त्यावर वाटीभर ओला नारळ थापावा व जाडसर खांडवी थापावी.

साजूक तुपाबरोबर खायला चांगली लागते. गूळ व साखरेबरोबर खोवलेला १ वाटी नारळ घातला तर खांडवी चविष्ट होते.

वरई तांदूळ पाण्याच्या ऐवजी दीड वाटी नारळाच्या दुधात शिजवले तर खांडवी चांगली लागते. वऱ्याचे तांदुळ धुवून वाळवून मिक्सरवर रवाळ वाटून शिरा करावा चांगला होतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.