Navratri Recipe : सोप्या पद्धतीने उपवासाची कचोरी कशी बनवायची माहितीये का?

Upvasachi Kachori : कचोरी हा पदार्थ तोंडाला पाणी सुटेल असाच आहे. तर ही उपवासाची कचोरी कशी बनवायची हे सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात.
Navratri Recipe
Navratri Recipe esakal
Updated on

Navratri Vrat Recipe :

नवरात्रीच्या उपवासाला सुरूवात झाली आहे. नवरात्रीच्या नऊ दिवसात काहीही न खाता पिता उपवास करतात. तर काही लोक काही हलके पदार्थ खाऊन उपवास करतात. उपवासा दरम्यान काही लोक खिचडी खातात. पण, सतत खिचडी खाल्ली तर पोट दुखी अन् पित्त वाढते. त्यामुळे उपवासात कधीतरी खिचडी खाऊ शकता.

इतर वेळी खाण्यासाठी तुम्ही उपवासाची कचोरी बनवू शकता. कचोरी हा पदार्थ तोंडाला पाणी सुटेल असाच आहे. तर ही उपवासाची कचोरी कशी बनवायची हे सोप्या पद्धतीने जाणून घेऊयात. (Navratri 2024)

Navratri Recipe
Navratri Fast Recipe: नवरात्रीत उपवासाला बनवा दही-आलू, नोट करा रेसिपी, दिवसभर राहाल उत्साही

उपवासाची कचोरी कशी बनवायची? (Navratri Vrat Kachori Recipe)

सारणासाठी साहित्य :

२ वाट्या खोवलेला ओला नारळ, १ मूठ कोथिंबीर बारीक चिरून, ४ मिरच्या वाटून, ५० ग्रॅम काजू तुकडा, थोडे बेदाणे, १ लिंबाचा रस, चवीनुसार मीठ व साखर.

कचोरीच्या कव्हरकरता साहित्य :

अर्धा किलो बटाटे, १०० ग्रॅम आरारूट, मीठ, तळण्याकरता वनस्पती तूप.

Navratri Recipe
Navratri Fast Recipe: नवरात्रीत सकाळी नाश्त्यात बनवा फ्रूटसॅलड, दिवसभर राहाल उत्साही

कृती :

बटाटे उकडून सोलून गरम असताना किसणीवर किसावे किंवा पुरणयंत्रातून काढावे. किसणीला किंवा पुरणयंत्राला तेलाचा हात लावावा. बटाट्याच्या किसलेल्या गोळ्यात मीठ व आरारूट घालून गोळा तयार करावा.

खोवलेल्या खोबऱ्यात कोथिंबीर, वाटलेल्या मिरच्या, काजू, बेदाणे, मीठ, लिंबाचा रस व थोडी जास्त साखर घालून सारण हलक्या हाताने मिसळावे. सारण आंबट गोडसर हवे. किसलेल्या बटाट्याच्या २० ते २५ गोळ्या कराव्यात. प्रत्येक गोळ्याची तुपाच्या हाताने वाटी करून १ टी स्पून सारण भरून तोंड बंद करावे. अशा सर्व कचोऱ्या भराव्यात. ह्या कचोऱ्या हाताने चपट्या करायच्या नाहीत.

कढईत भरपूर तुपात मंद आचेवर गुलाबी रंगावर तळाव्यात. (६) नारळ, कोथिंबीर, दाण्याचे कूट, मीठ, साखर यांच्या सरसरीत चटणीबरोबर द्याव्यात. वरील साहित्यात २४ ते २५ छोट्या गोल कचोऱ्या होतात.

Navratri Recipe
Navratri Recipe : नवरात्र स्पेशल घरच्या घरी तयार करा बीटाचा हलवा

कचोऱ्या उपवासाला वापरायच्या असल्यास त्यात आरारूट घालावे. अन्यथा कॉर्नफ्लोअर वापरले तरी चालते. उपवासाला चालतात म्हणून वनस्पती तुपामध्ये तळाव्यात, नाहीतर रिफाईंडमध्ये तळून चांगल्या होतात. कचोऱ्या गार झाल्यावर मऊ पडतात म्हणून शक्यतो गरम गरम खाण्यास द्याव्यात.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.