Bangladesh Violence: अन् 18 जण जिवंत जळाले... हिंसक जमावाने पेटवले हॉटेल, बांगलादेशातील परिस्थिती आणखी बिघडली

Sheikh Hasina: हजारो लोक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचा आनंद साजरा करत होते. या दरम्यान, काही लोकांनी चित्तरमोर परिसरातील जबीर हॉटेलला आग लावली आणि त्यातील फर्निचरची तोडफोड केली.
18 People Burnt Alive In Bangladesh Hotel
18 People Burnt Alive In Bangladesh HotelEsakal
Updated on

बांगलादेशात गेल्या काही दिवसांपासून हिंसाचार सुरू असून, त्यामध्ये आतापर्यंत शेकडो लोकांनी प्राण गमावले आहेत. अशात पंतप्रधान शेख हसीना यांनी पदाचा राजीनामा देत सेश सोडला असून भारतात आश्रय घेतला आहे.

दरम्यान बांगलादेशातून आणखी एक धक्कादायक बातमी येत आहे. येथे सोमवारी रात्री जेसोरमधील एका निवासी हॉटेलला जमावाने पेटवून दिल्याने यात किमान 18 जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ८४ जण जखमी झाले आहेत.

हे हॉटेल, जेसोर जिल्हा अवामी लीगचे सरचिटणीस शाहीन चकलादार यांच्या मालकीचे होते. पोलीस उपायुक्त अबरारुल इस्लाम यांनी या जाळपोळीच्या घटनेच्या वृत्ताल दुजोरा दिला आहे.

जेसोर जनरल हॉस्पिटलचे कर्मचारी हारुण-ओर-रशीद यांनी सांगितले की, तेथे किमान 84 लोक उपचार घेत आहेत, त्यापैकी बहुतेक विद्यार्थी आहेत.

देशातील विविध शहरांमध्ये हजारो लोक पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याचा आनंद साजरा करत होते. या दरम्यान, काही लोकांनी चित्तरमोर परिसरातील जबीर हॉटेलला आग लावली आणि त्यातील फर्निचरची तोडफोड केली.

याशिवाय, जिल्हा अवामी लीगचे कार्यालय आणि शारशा आणि बेनापोल भागातील आणखी तीन अवामी लीग नेत्यांच्या घरांची तोडफोड केली.

18 People Burnt Alive In Bangladesh Hotel
Hindus In Bangladesh: बांगलादेशात मंदिरे, हिंदू महिला अन् नेते टार्गेट; आक्रोश करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल

दुसरीकडे चितगावमधील किमान सहा पोलिस ठाण्यांवर हल्लेखोरांनी हल्ला करत, आग लावली. यासह तिथली शस्त्रे, गोळ्या आणि विविध उपकरणे लुटली.

शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या वृत्तानंतर संतप्त जनसमुदाय रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करत आहे. यामध्ये चितगाव मेट्रोपॉलिटन पोलीस अंतर्गत चंदगाव, पतेंगा, ईपीझेड, कोतोवाली, अकबर शाह आणि पहारताली येथील पोलीस ठाण्यांवर हल्ले, तोडफोड आणि आग लावण्यात आली.

याशिवाय, अवामी लीगचे नेते आणि कार्यकर्त्यांची घरे आणि अधिकाऱ्यांनाही लक्ष्य करण्यात येत आहे, असे ढाका ट्रिब्यूनने वृत्त दिले आहे.

18 People Burnt Alive In Bangladesh Hotel
Bangladesh Election 2024: बांगलादेशमध्ये निवडणुकांना हिंसक वळण! दोन जण ठार, अनेक भागात मतदान थांबवलं

बांगलादेशातील आरक्षण आणि माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या निषेधार्थ झालेल्या हिंसाचारात सोमवारी १३५ जणांचा मृत्यू झाला.

हल्लेखोरांनी रुग्णालये, हॉटेल, रस्ते पेटवून दिले. याशिवाय शेख हसीना यांचा पक्ष अवामी लीगच्या खासदार आणि नेत्यांच्या घरांची तोडफोड करण्यात आली. अनेक जिल्ह्यांमध्ये अवामी लीगच्या नेत्यांच्या हत्या झाल्या. या हिंसाचारानंतर संपूर्ण देशात अराजकता आणि अशांततेचे वातावरण आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.