Tikka Khan: भारतीय सैन्यात कॅप्टन ते पाकिस्तानचा लष्कर प्रमुख... कसाई ज्याने एका रात्रीत घेतले 7 हजार बांग्लादेशी लोकांचे जीव

Bangladesh Crisis And PM Sheikh Hasina: अशात बांग्लादेशच्या इतिहासातील जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. जेव्हा एकाच रात्रीत 7000 बांग्लादेशी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.
Butcher Of Bangladesh Tikka khan
Butcher Of Bangladesh Tikka khanEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांपासून बांग्लादेशात मोठ्या प्रमाणात हिंसाचार सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत सुमारे 500 लोकांनी आपला जीव गमावला आहे. परिणामी पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना राजीनामा देत भारतात आश्रय घ्यावा लागला आहे.

अशात बांग्लादेशच्या इतिहासातील जुन्या आठवणी पुन्हा जाग्या झाल्या आहेत. जेव्हा एकाच रात्रीत 7000 बांग्लादेशी नागरिकांना आपला जीव गमवावा लागला होता.

ही गोष्ट आहे 1970 च्या दशकातील. टिक्का खान यांना ‘बचूर ऑफ बांग्लादेश’ हे नाव मिळाले होते. टिक्का हे पाकिस्तानी लष्कराचे ४-स्टार जनरल होते आणि पाकिस्तानचे पहिले लष्करप्रमुखही होते. या भयंकर लष्करप्रमुखाने एका रात्रीत सात हजार लोकांची हत्या केली होती.

भारतीय सैन्यात कॅप्टन

टिक्का खान यांचा जन्म १९१५ मध्ये रावळपिंडीजवळील एका गावात झाला. त्यावेळी रावळपिंडी हा अविभाजित भारताचा भाग होता. टिक्का हे आधी भारतीय सैन्यात कॅप्टन होते पण देशाच्या फाळणीच्या वेळी ते पाकिस्तानात गेले आणि तिथल्या सैन्यात मेजर झाले.

1965 च्या भारत-पाकिस्तान युद्धातही टिक्का यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर 1969 मध्ये जेव्हा पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी स्वतंत्र देश बनवण्याची मागणी सुरू केली.

त्यावेळी पाकिस्तानचे लष्‍करप्रमुख याह्या खान होते. वेगळ्या देशाच्या मागणीने याह्या खूप नाराज झाले, त्याने टिक्का खान यांना पूर्व पाकिस्तानात म्हणजे आजच्या बांग्लादेशला पूर्ण मोकळीक देऊन पाठवले.

Butcher Of Bangladesh Tikka khan
Bangladesh Government Crisis: कोण आहेत बांगलादेशचे लष्करप्रमुख झमान? महिन्याभरापूर्वीच घेतला होता पदभार

'बांग्लादेशचा कसाई'

स्वतंत्र देशाची मागणी करणाऱ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जनरल टिक्का खान ढाक्याला गेले आणि तिथे त्यांनी 'ऑपरेशन सर्चलाइट' चालवले.

एका अहवालानुसार, त्यांनी एका रात्रीत ढाकामध्ये 7000 लोकांची हत्या केली. इतकेच नव्हे तर त्यांनी आपल्या सैनिकांना बांग्लादेशातील हिंदू महिला असो वा मुस्लिम त्यांच्यावर क्रूरपणे बलात्कार करण्याचे आदेश दिले

बांगलादेशातील या हत्याकांडावर रॉबर्ट पेन यांनी लिहिलेल्या पुस्तकानुसार, 1971 च्या केवळ नऊ महिन्यांत बांगलादेशात सुमारे दोन लाख महिला आणि मुलींवर बलात्कार झाले होते. या घटनेनंतर टाइम मासिकाने टिक्का खान यांना 'बांग्लादेशचा कसाई' असे नाव दिले होते.

Butcher Of Bangladesh Tikka khan
Sheikh Hasina: शेख हसीना बांगलादेशातून हेलिकॉप्टरने निसटल्या, तो Video Viral; बहिणीसह केलं पलायन

क्रूरतेच्या आठवणी

या घटनेनंतर तीन वर्षांनी पाकिस्तान सरकारने टिक्का खान यांना लष्करप्रमुख केले. टिक्का यांचे २०२० साली निधन झाले. पण आजही बांगलादेशातील वृद्ध लोक त्याच्या क्रूरतेच्या आठवणीने थरथर कापतात.

आज बांग्लादेशला स्वातंत्र्य मिळून जवळपास 55 वर्षे झाली आहेत आणि पुन्हा एकदा तेथे अस्थिरता निर्माण झाली आहे. शेख हसीना यांनी आता आपल्या पंतप्रधान पदाचा राजीनामा दिला असून, त्यांनी भारतात आश्रय घेतला आहे. तर देशाची सत्ता आता लष्कराच्या हातात गेली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.