Durga Pandal Bangladesh: बांगलादेशमध्ये 35 दुर्गा पूजा मंडपांवर हिंसक हल्ले; पेट्रोल बॉम्बही फेकले

Hindus In Bangladesh: मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिंदूंच्या व्यापारी प्रतिष्ठानांची आणि मालमत्तेची तोडफोड केली होती. तसेच हिंदू मंदिरांचेही नुकसान केले होते.
Durga Puja Bangladesh Petrol Bomb Attack Video
Durga Puja Bangladesh Petrol Bomb Attack VideoEsakal
Updated on

बांगलादेशात हिंदूंना दुर्गापूजा करण्यात मोठ्या अडचणी येत आहेत. कारण एकाच वेळी ढाक्यातील 35 हून अधिक दुर्गा पूजा मंडपांवर हल्ले करण्यात आले आहेत. त्यामुळे दुर्गापूजा उत्सवात मोठा व्यत्यय आला.

अराजकतावाद्यांनी अनेक मंडपांवर पेट्रोल बॉम्बने हल्ले केले. दुर्गापूजा उत्सवापूर्वी अनेक मुस्लिम संघटनांनी हिंदूंना दुर्गापूजा न करण्याची धमकी दिली होती. या घटनांमुळे हिंदूंमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे.

बांगलादेशातील दुर्गा पूजा उत्सवाशी संबंधित सुमारे 35 अनुचित घटनांनंतर 17 जणांना अटक करण्यात आली असून 12 हून अधिक गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली.

बांगलादेशातील दक्षिण-पश्चिम सतखिरा जिल्ह्यातील एका हिंदू मंदिरातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भेट दिलेला हाताने तयार केलेला सोन्याचा मुकुट दुर्गापूजेच्या उत्सवादरम्यान चोरीला गेल्याच्या एका दिवसानंतर ही घटना घडली आहे.

चोरीच्या या घटनेवर भारताने चिंता व्यक्त केली होती. महाषष्ठी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पाच दिवसीय हिंदू धार्मिक सणाची सुरुवात बुधवारी दुर्गा देवीच्या आवाहनाने झाली. रविवारी दुर्गादेवीच्या मूर्तीच्या विसर्जनाने उत्सवाची सांगता होणार आहे.

Durga Puja Bangladesh Petrol Bomb Attack Video
Jashoreswari Kali Temple: काली मातेचा मुकुट मंदिरातून चोरीला; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला होता भेट

बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या हकालपट्टीनंतर अल्पसंख्याक हिंदूंवर सातत्याने हल्ले होत आहेत. 5 ऑगस्ट रोजी शेख हसीना यांची पंतप्रधानपद सोडल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात हिंदूंना प्रचंड त्रास सहन करावा लागला होता.

मुस्लिम धर्माच्या लोकांनी हिंदूंच्या व्यापारी प्रतिष्ठानांची आणि मालमत्तेची तोडफोड केली होती. तसेच हिंदू मंदिरांचेही नुकसान केले होते.

1 ऑक्टोबरपासून, देशभरात सुरू असलेल्या दुर्गा पूजा उत्सवाशी संबंधित 35 घटना घडल्या आहेत, त्यापैकी 11 गुन्हे नोंदवले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

Durga Puja Bangladesh Petrol Bomb Attack Video
Sunita Williams Latest Update : अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्ससाठी धोका वाढला? स्पेस स्टेशनवर मोठ्या प्रमाणावर हवा गळती सुरू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.