Japanese man sleeping story:
नवी दिल्ली- निरोगी आयुष्यासाठी किमान सहा तासांची झोप आवश्यक असते असं तज्ज्ञ सांगतात. सहा तासांपेक्षा कमी झोप झाल्यास विविध आजारांना निमंत्रण मिळते. याशिवाय चिडचिडपणा वाढतो आणि कोणत्याही गोष्टीत मन लागत नाही. असे असताना जपानचा एक व्यक्ती गेल्या १२ वर्षांपासून दररोज ३० मिनिटे झोप घेत असल्याचं समोर आलं आहे.
साऊथा चायना मॉर्निंग पोस्टच्या रिपोर्टमध्ये यासंदर्भातील दावा करण्यात आला आहे. जपानचा नागरिक असलेला डाइसुके होरी हा ४० वर्षांचा आहे. त्याने दावा केलाय की दररोज ३० मिनिटांची झोप त्याच्यासाठी पुरशी आहे. इतकी कमी झोप घेऊन देखील तो दिवसभर ताजातवाणा राहतो. तो दररोज व्यायाम, जेवण, चालणे, फिरणे असे कामे उत्साहाने करत असतो.