Mashrafe Mortaza: क्रिकेटपटूंनाही हिंसाचाराची झळ! बांगलादेशच्या माजी कर्णधाराचे घर आंदोलकांनी पेटवले; Video Viral

Bangladesh Crisis: आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत, त्याने 36 कसोटी, 220 एकदिवसीय आणि 54 T20 सामन्यांमध्ये 390 आंतरराष्ट्रीय विकेट घेत 2,955 धावा केल्या आहेत.
Mashrafe Mortaza House Set On Fire
Mashrafe Mortaza House Set On FireEsakal
Updated on

बांगलादेश क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मश्रफी मुर्तझा याच्या घराला आंदोलकांनी आग लावली. देशात सध्या सुरू असलेल्या अराजकतेच्या पार्श्वभूमीवर पोलिस आणि सुरक्षा दलांकडून विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन गोळ्या घातल्या जात आहेत.

आंदोलकांनी सत्ताधारी अवामी लीग पक्षाचे खासदार मुर्तझा यांच्यावर बांगलादेशातील "विद्यार्थ्यांचे हत्याकांड आणि सामूहिक अटक" यावर मौन बाळगल्याबद्दल संताप व्यक्त केला.

यावेळी जिल्हा अवामी लीगचे कार्यालय आणि पक्षाचे अध्यक्ष सुभाषचंद्र बोस यांचे निवासस्थानही जमावाने जाळले.

मोर्तझाने 117 सामन्यांमध्ये बांगलादेशचे कर्णधारपद भूषवले आहे. देशासाठी सर्वाधिक सामन्यांमध्ये नेतृत्त्व करण्याचा विक्रम त्याच्या नावे आहे.

आपल्या प्रदीर्घ क्रिकेट कारकिर्दीत, त्याने 36 कसोटी, 220 एकदिवसीय आणि 54 T20 सामन्यांमध्ये 390 आंतरराष्ट्रीय विकेट घेत 2,955 धावा केल्या आहेत.

निवृत्तीनंतर, त्याने 2018 मध्ये राजकारणात प्रवेश केला, हसिना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीगमध्ये सामील झाला आणि नरेल-2 मतदारसंघातून खासदार म्हणून विजय मिळवला.

Mashrafe Mortaza House Set On Fire
Tikka Khan: भारतीय सैन्यात कॅप्टन ते पाकिस्तानचा लष्कर प्रमुख... कसाई ज्याने एका रात्रीत घेतले 7 हजार बांग्लादेशी लोकांचे जीव

कसं सुरू झालं आंदोलन?

सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू झालेले आंदोलन पुन्हा एकदा उग्र झाले. देशभरात झालेल्या हिंसाचारात आधी जवळपास 100 लोक मारले गेले आणि शेकडो जखमी झाले.

हजारो आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या गोळीबार आणि रबराच्या गोळ्या झाडल्या. यात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये 14 पोलिसांचाही समावेश होता.

काही ठिकाणी सत्ताधारी पक्ष अवामी लीगचे कार्यकर्ते आणि आंदोलक विद्यार्थ्यांमध्ये हाणामारीही झाली. काही ठिकाणी अवामी लीगचे कार्यकर्ते आणि नेतेही मरण पावले. अशा प्रकारे या हिंसक आंदोलनामुळे 300 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला.

Mashrafe Mortaza House Set On Fire
Hindus In Bangladesh: बांगलादेशात मंदिरे, हिंदू महिला अन् नेते टार्गेट; आक्रोश करणाऱ्या महिलांचा व्हिडिओ व्हायरल

सोमवारी हिंसाचाराला पुन्हा नवे वळण मिळाले आणि पंतप्रधान शेख हसिना यांना राजीनामा द्यावा लागला. राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना यांनी देश सोडला आणि भारतात आश्रय घेतला.

शेख हसीना यांनी निवासस्थान सोडल्यानंतर आंदोलकांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा ताबा घेत त्यामध्ये धुडगूस घातला. यानंतर लष्करप्रमुखांनी देशातील परिस्थितीवर एक निवेदन जारी करत आंदोलकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आणि देशात लवकरच अंतरिम सरकार स्थापन होणार असल्याचे सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.