Bangladesh Violence: विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या नावाखाली डिटेक्टिव्ह ब्रँचनं डांबून ठेवलं अन्....; बांगलादेशात चिघळलं आंदोलनं

Bangaladesh Riots: उघडकीस येताच आंदोलन आणखी भडकले. विद्यापीठ परिसरातून त्यांनी आंदोलन सुरू केले होते.
Bangladesh Violence: विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या नावाखाली डिटेक्टिव्ह ब्रँचनं डांबून ठेवलं अन्....; बांगलादेशात चिघळलं आंदोलनं
Updated on

Bangladesh Violence: बांगलादेशात गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या आरक्षणाच्या विरोधातील आंदोलनामध्ये तेथील विद्यार्थी संघटनांचीही भूमिका महत्त्वाची ठरली. या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या सहा जणांना ‘डिटेक्टिव्ह ब्रँच’ने सुरक्षित ठेवण्याच्या नावाखाली सहा दिवस डांबून ठेवले होते.

यातील नाहिद इस्लाम, आसिफ महमूद आणि अबू बकर मजुमदार हे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्वांकडून आंदोलन मागे घेण्यासाठी जबरदस्तीने व्हिडिओ बनवण्यात आला. ही बाब उघडकीस येताच आंदोलन आणखी भडकले. विद्यापीठ परिसरातून त्यांनी आंदोलन सुरू केले होते.

Bangladesh Violence: विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या नावाखाली डिटेक्टिव्ह ब्रँचनं डांबून ठेवलं अन्....; बांगलादेशात चिघळलं आंदोलनं
Bangladesh Violence: अन् 18 जण जिवंत जळाले... हिंसक जमावाने पेटवले हॉटेल, बांगलादेशातील परिस्थिती आणखी बिघडली

नाहिद इस्लाम : हा विद्यार्थी चळवळीतील सर्वांत आघाडीचा नेता आहे. “आम्ही आज लाठ्या उचलल्या आहेत, लाठी चालली नाही तर आम्ही शस्त्र उचलण्यास तयार आहोत. पंतप्रधान हसीना यांना देशाला गृहयुद्धात ढकलायचे आहे. आता शेख हसीना यांना निर्णय घ्यायचा आहे की पदावरून पायउतार व्हायचे की पदावर राहण्यासाठी रक्तपात करायचा,’’ असे वक्तव्य त्याने रविवारी केले होते. इस्लाम हा ढाका विद्यापीठातील विद्यार्थी आहे. २० जुलै रोजी सकाळी आपल्याला ताब्यात घेण्यात आले होते, असा आरोप त्याने केला होता.

सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला. गणवेशातील काही जण इस्लामला मोटारीमध्ये बसवत आहेत, असे त्यात दिसून येत होते. इस्लाम बेपत्ता झाल्यानंतर २४ तासांनी एका पुलाखाली बेशुद्धावस्थेत सापडला होता. बेशुद्ध होईपर्यंत लोखंडी सळईने मारहाण करण्यात आली, असा दावा त्याने केला होता. पोलिसांनी तो फेटाळला.

डिटेक्टिव्ह ब्रँचने त्याला २६ जुलै रोजी उपचारादरम्यान रुग्णालयातून ताब्यात घेतले होता. या वेळी डिटेक्टिव्ह ब्रँचने त्याच्या सुरक्षेचे कारण देण्यात आले होते. पोलिसांनी ताब्यात घेण्यापूर्वी एका वृत्तपत्राशी बोलताना तो म्हणाला होता, ‘‘२० जुलै रोजी पहाटे दोन वाजता सुमारे २५ ते ३० लोकांनी कोणतेही कारण न देता मला जबरदस्तीने घेऊन गेले होते.’’

पोलिसांनी केलेल्या मारहाणीत नाहिद इस्लाम हा जखमी झाला. यामुळे आंदोलक विद्यार्थी आणखी भडकले आणि रस्त्यावर उतरले. सरकारने हिंसाचार सुरूच ठेवला तर आम्ही बांगलादेशाच्या संसदेत पोचू, असा इशाराही नाहिद इस्लामने दिला होता.

Bangladesh Violence: विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या नावाखाली डिटेक्टिव्ह ब्रँचनं डांबून ठेवलं अन्....; बांगलादेशात चिघळलं आंदोलनं
Bangladesh Violence: ISKCON मंदिर पेटवलं, मूर्तींची तोडफोड; हसीना यांच्या पलायनानंतर बांगलादेशमध्ये हिंदू धोक्यात

आसिफ महमूद : हा ढाका विद्यापीठातील भाषा विभागातील विद्यार्थी आहे. जूनमध्ये सुरू झालेल्या आरक्षणाविरोधातील देशव्यापी आंदोलनात तो सक्रिय आहे. डिटेक्टिव्ह ब्रँचने २६ जुलै रोजी ताब्यात घेतलेल्यांमध्ये आसिफ महमूदचाही समावेश होता. त्यालाही सुरक्षिततेचे कारण देऊन ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर सरजीस आलम आणि हसनत अब्दुल्ला, अशा आणखी दोन विद्यार्थी नेत्यांना २७ जुलै रोजी डिटेक्टिव्ह ब्रँचने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. या विद्यार्थी नेत्यांना भेटू देण्याची मागणी त्यांच्या नातेवाइकांनी केली होती मात्र पोलिसांनी त्याला नकार दिला होता. त्यानंतर २९ जुलै रोजी त्यांना भेटण्याची परवानगी देण्यात आली. त्याआधी माहिद, आसिफ आणि त्यांचा सहकाऱ्यांचा एक व्हिडिओ पोलिसांनी जारी केला. त्यात आंदोलन मागे घेण्याचे आवाहन या नेत्यांनी केले होते. पोलिसांनी जबरदस्ती करून हा व्हिडिओ करण्यास भाग पाडले होते, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला होता. आसिफला पोलिसांनी विविध इंजेक्शन दिल्याचाही आरोप केला जातो. त्यामुळे तो काही दिवस बेशुद्ध होता.

विद्यार्थ्यांच्या अटकेला देशभरातून विरोध होऊ लागल्यानंतर एक ऑगस्ट रोजी त्याची कोठडीतून सुटका करण्यात आली होती. त्यानंतर तीन ऑगस्ट रोजी आसिफने फेसबुकवर पोस्ट करून विद्यार्थ्यांना ठिकठिकाणच्या आंदोलनात सहभागी होण्याची हाक दिली होती.

शेख हसीना देश सोडून पळून गेल्यानंतरही आसिफने प्रसारमाध्यमांशी बोलताना, ‘देशात लष्करी राजवट स्वीकारणार नाही’ असे वक्तव्य केले आहे.

Bangladesh Violence: विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या नावाखाली डिटेक्टिव्ह ब्रँचनं डांबून ठेवलं अन्....; बांगलादेशात चिघळलं आंदोलनं
Bangladesh Violence: बांगलादेशात किती भारतीय अडकलेत? परराष्ट्रमंत्री जयशंकर यांनी संसदेत दिली माहिती

अबू बकर मजुमदार : हा ढाका विद्यापीठातील भूगोल विभागातील विद्यार्थी आहे. मानवी हक्कांबाबतही तो काम करत असल्याची माहिती पुढे आली आहे.

आरक्षणाबाबत पाच जून रोजी न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अबू बकरने त्याच्या मित्रांसह आंदोलन सुरू केले. स्वातंत्र्य सैनिक आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी जास्त जागा राखीव ठेवण्यात त्याने कडाडून विरोध केला. अबूला १९ जुलै रोजी सायंकाळी काही लोकांनी पळवून नेले होते. अनेक दिवसांनी त्याला जिथून पळवून नेण्यात आले होते, तेथेच सोडून देण्यात आले. या दरम्यानच्या काळात पोलिसांना बंद खोलीत डांबून ठेवल्याचे व आंदोलन मागे घेण्यासाठी दबाव टाकत होते, असा आरोप त्याने सुटकेनंतर केला. तसेच त्याला मारहाणही करण्यात आली होती. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. इतर नेत्यांप्रमाणे त्यालाही २६ जुलै रोजी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते.

Bangladesh Violence: विद्यार्थ्यांना सुरक्षिततेच्या नावाखाली डिटेक्टिव्ह ब्रँचनं डांबून ठेवलं अन्....; बांगलादेशात चिघळलं आंदोलनं
Bangladesh Violence : लोकशाहीवर ‘जमावशाही’ची हुकूमत! भारताच्या शेजारील देशांत तीन वर्षांत हिंसाचार; नेमकं कुठे काय झालं?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.