आरोग्य चांगले राहावे, यासाठी नियमित व्यायामाला अत्यंत महत्त्व आहे. एका नवीन संशोधनानुसार चाळीशीनंतर फक्त 10 मिनिटं शारीरिक व्यायाम ( Exercise) केल्याने दिर्घायुषी होण्यासाठी मदत मिळते. जामा इंटर्नल मेडिसिन जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे. यूएसमधील प्रौढांच्या दीर्घायुष्यातील वाढीचे विश्लेषण या अभ्यासात (Study) केले आहे. त्यानुसार दररोज 20 किंवा 30 मिनिटे शारीरिक हालचाली केल्याने फायदे होतात , असे नमूद करण्यात आले आहे.
संशोधकांनी नॅशनल हेल्थ अँड न्यूट्रिशन एक्झामिनेशन सर्व्हे मधील डेटा निष्कर्षासाठी वापरला. त्यासाठी सहापेक्षा जास्त वयोगटातील मुलांना 2003 ते 2006 या काळात सात दिवसांसाठी एक्सेलेरोमीटर घालण्यास सांगितले होते. संशोधकांनी नंतर 40 ते 85 वर्षे वयोगटातील 4,850 लोकांच्या आरोग्य (Health) नोंदी तपासल्या. त्यानंतर 2015 मध्ये त्यांची स्वयं-अहवाल आरोग्य स्थिती तपासण्यासाठी पाठपुरावा केला.
अभ्यासातील निष्कर्ष
अभ्यासात, 40 ते 85 वयोगटातील यूएसमधील प्रौढांनी दररोज फक्त 10 मिनिटे शारीरिक हालचालींची तीव्रता (MVPA) वाढवली तर दर वर्षी अंदाजे 1,10,000 मृत्यू (6.9 टक्के) टाळता येतील. 20 किंवा 30 मिनिटांनी MVPA वाढवली तर अनुक्रमे 3 टक्के आणि 16.9 टक्के मृत्यू दर कमी होईल. असे आढळले आहे. विशेष म्हणजे, हे परिणाम लिंगावर आधारलेले आहेत.
शारीरिक हालचाल का गरजेची (Why is physical activity essential?)
डब्ल्यूएचओच्या मते, नियमित शारीरिक हालचाली केल्यास हृदयविकार, स्ट्रोक, मधुमेह तसेच कर्करोगासारखे आजार टाळता येऊ शकतात. शारीरिक हालचाली, व्यायाम केल्याने उच्चरक्तदाब टाळता येतो, वजन संयमित राहते. तसेच शारीरिक मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते. त्यामुळे 18-64 वर्षे वयोगटातील लोकांनी किमान 150-300 मिनिटे मध्यम ते तीव्र प्रमाणात एरोबिक्स व्यायाम प्रकार केले पाहिजेत. तसेच दर आठवड्याला वॉक घेणेही गरजेचे आहे. जसजशी वेळ वाढेल तशी तुमच्यातली स्ट्रेंन्थही वाढेल.
व्यायाम आणि शारीरीक हालचाल यात फरक काय? (differentiate between exercise and activity)
याविषयी कार्डिओलॉजीस्ट आणि पेडियाट्रिक कार्डिओलॉजीस्ट डॉ. हेमंत मदन यांनी इंडियन एक्सप्रेसला माहिती दिली. ते म्हणतात कि व्यायाम आणि शारीरिक हालचाल यातील फरक समजून घेणे गरजेचे आहे. व्यायाम हा तुमच्या हृदयाचे ठोके वाढवण्यासाठी, स्नायू मजबूत करण्यासाठी आणि लवचिकता वाढण्यासाठी मदत करतो. तुमच्या शारीरिक आरोग्यावर लक्ष केंद्रित करण्यासाठी तुम्ही ठरवलेली एक योग्य वेळ आहे. तेव्हाच तुम्ही व्यायाम करता. तर शारीरिक हालचाली म्हणजे तुम्ही दिवसभरात किती हालचाल करतो ते महत्वाचे आहे. उदाहरणार्थ, बैठी व्यक्ती दिवसाचा बराचसा वेळ बसून घालवते. तर, सक्रिय व्यक्ती दिवसभर चालणे, पायऱ्या चढणे, उभे राहणे आणि फिरणे यासारख्या गोष्टी करते. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुम्ही शारीरिक हालचाली वाढवल्या पाहिजेत असे डॉक्टरांनी नमूद केले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.