व्हिडिओ गेम्स खेळल्याने होतो आरोग्याला फायदा! Exergaming विषयी जाणून घ्या

जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांनी याविषयी अभ्यास केला आहे.
video games also benefit for health
video games also benefit for health
Updated on

व्हिडिओ गेम जास्त वेळ खेळत असाल तर त्यामुळे सवय लागू शकते. तसेच अभ्यासावरही परिणाम होतो. मुलांवर तर हे गेम्स खेळल्याने वाईट परिणाम होऊ शकतात असेही सांगितले जाते. मुलांना बाहेरचे खेळ खेळण्यापासून व्हिडिओ गेम्स परावृत्त करतात. तसेच डोळ्यांवरही परिणाम होतो. पण जर तुम्ही याकडे वेगळ्या दृष्टीने बघितलं तर त्याचे दुष्परिणाम दिसण्यापेक्षा आरोग्याला होणारे फायदे तुम्हाला दिसतील, जॉर्जिया विद्यापीठातील संशोधकांनी केलेल्या नवीन अभ्यासात, एक्सरगेमिंग (Exergaming) किंवा एक्टीव्ह व्हिडिओ गेमिंग गेमिंग (active video gaming)शरीराला पूर्णपणे सक्रिय ठेवण्यास मदत करतात. ही क्रिया तुमच्या आरोग्यासाठी चांगली आहे.

video games also benefit for health
Sports Bra खरेदी करताय! या ११ गोष्टी ठेवा लक्षात

संशोधकांच्या मते, यामध्ये लोकं त्यांच्या आवडीचा खेळ निवडू शकतात. डान्स रिव्होल्यूशन, ईए स्पोर्ट्स अॅक्टिव्ह आणि बीट सेव्हर हे काही लोकप्रिय एक्सरगेम (Exergaming) आहेत. हे खेळ वेगळे आहेत. या अभ्यासात असे दिसून आले आहे की एक्सरगेममुळे एक प्रकारचे स्वातंत्र्य अनुभवायला मिळते. व्यायाम टाळण्याच्या प्रवृत्तीवर मात करता येते. या अभ्यासाचे निष्कर्ष 'इंटरनॅशनल जर्नल ऑफ स्पोर्ट अँड एक्सरसाइज सायकोलॉजी'मध्ये (International Journal of Sport and Exercise Psychology) प्रसिद्ध झाले आहेत.

video games also benefit for health
दोरीच्या उड्या कि धावणे! वजन कमी करण्यासाठी योग्य पर्याय कोणता?
exergaming
exergaming

एक्सरगेमिंग म्हणजे काय?

याला फिटनेस गेम असेही म्हणतात व्हिडिओ गेम बघता बघता व्यायाम करण्याची क्रिया करण्यासाठी एक्सरगेमिंग हा शब्द वापरला गेला. त्यामुळे याला एक प्रकारचा व्यायाम म्हटले जाते. एक्सरगेमिंग तंत्रज्ञानावर आधारित आहे, ज्यावरून शरीराचा वेग आणि त्याच्या प्रतिक्रियांचा मागोवा घेता येतो. हे सक्रिय जीवनशैलीसाठी हे स्विकारले जाऊ शकते.

video games also benefit for health
पाच मिनिटात पाच व्यायाम करा! झटपट एनर्जी मिळवा

असा झाला अभ्यास

या अभ्यासासाठी, 55 लोकांचा समावेश करण्यात आला होता. या लोकांची शारीरिक क्रिया दर आठवड्याला 150 मिनिटांपेक्षा कमी होती. या सहभागी झालेल्या लोकांना 6 आठवडे याप्रमाणे दर आठवड्याल 3 क्लास एक्सरगेम किंवा पारंपारिक एरोबिक्समधील कोणतीही एक्टिव्हिटी करायला सांगितली होती. व्यायामादरम्यान यात सहभागी झालेल्यांची शारीरिक हालचाल एक्सेलेरोमीटरने तसेच हृदय गती मोजली गेली. सहभागी झालेले लोकं किती मेहनत करायला तयार आहेत याची याद्वारे माहिती घेण्यात आली. संशोधकांनी या एक्टीव्हीटीदरम्यान वर्कआउटसाठी त्यांच्या आनंदाचे आणि प्रेरणांचे मूल्यांकन केले.

video games also benefit for health
व्यायामानंतर थंड की गरम कोणते पाणी प्यावे? शास्त्र सांगतं...
exergaming
exergaming

अभ्यासातील निष्कर्ष

ज्या लोकांना पारंपारिक व्यायाम करायला सांगितला होता, त्यांनी एक्सरगेमिंग करणाऱ्यांपेक्षा जास्त मेहनत घेतली. अवघड काम करण्यासाठी कोणीतरी त्याच्यावर लक्ष ठेवून आहे असे त्यांना वाटले. पण एक्सरगेमर्स करणार्‍यांकडे चांगला वेळ होता. नियमित व्यायाम करण्यापेक्षा त्यांना वेगळी स्वतंत्र भावना होती. त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादा खेळ विकत घेतातेव्हा लक्षात ठेवा की त्यात शारीरिक हालचाली असलेल्या खेळांचाही समावेश असावा, अशी संशोधकांनी शिफारस केली आहे. असे गेम खेळताना अनेक मुले किंवा प्रौढांना ते व्यायाम करत आहेत असे वाटत नाही. त्यामुळे तशाप्रकारचे गेम्स खेळा.

video games also benefit for health
व्यायामाच्या आधी अन् नंतर किती प्रमाणात पाणी प्यावे? जाणून घ्या योग्य पद्धत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.