रात्री झोपेत ओरडता का? अशी होईल समस्येपासून सुटका

रात्री झोपेत असताना अनेकजण ओरडून दचकून उठतात.
yelling-in-sleep
yelling-in-sleep
Updated on

रात्री झोपेत असताना अनेकजण ओरडून दचकून उठतात. किंवा काहीजण रात्री झोपेत काहीही बोलतात. ही समस्या वाढल्यास त्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अशा परिस्थितीत काही उपाय करून रात्रीच्या या समस्येवर, विकारावर मात करणे गरजेचे आहे.

yelling-in-sleep
८ तास झोपणे महत्वाचे नाही! झोपेची गुणवत्ता ठरते महत्वाची| Study

असू शकतात ही कारणे - ज्या लोकांना स्लिपिंग डिसऑर्डर असतो, असे लोक झोपेत स्वत:शीच बोलायला लागतात. अनेक लोक असं म्हणतात की या प्रकारची लक्षणे लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींमध्ये अधिक दिसतात. याला पॅरासोमनिया म्हणजे अनैसर्गिक वर्तन असेही म्हटले जाते.

yelling-in-sleep
पालकांनो, मुलांना झोपेची शिस्त लावा! वाचा अभ्यास काय सांगतो

ही आहेत लक्षणे - धावपळीच्या या जगात स्वत:ला वेळ देऊ न शकणे, रात्री वेळेत न झोपणे आणि ६ ते ८ तासांची झोप पूर्ण न होणे ही कारणे रात्री झोपेत ओरडण्यामागे असू शकतात. अनेक लोकांना बडबड करण्याची सवय असते. शरीराला जास्त विश्रांती न मिळणे हेही झोपेत बोलण्याचे प्रमुख कारण मानले जाते. चुकीची झोपेची वेळ हे देखील एक कारण आहे.

yelling-in-sleep
८ तास झोपणे महत्वाचे नाही! झोपेची गुणवत्ता ठरते महत्वाची| Study
Being stressed
Being stressed

हे आहेत उपाय- रात्री झोपेत ओरडू नये असे तुम्हाला वाटत असेल तर आधी तुम्हाला तणावमुक्त राहावे लागेल. झोपण्याची वेळ आणि पद्धत यावर लक्ष देण्याची गरज आहे. यासाठी पाठीवर झोपण्याची सवय लावून घ्या. सर्वात महत्त्वाचे म्हणजे खाण्यापिण्याकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. तसेच नियमित व्यायामावर भर देणे गरजेचे आहे. असे केल्याने तुमचे शरीर तंदुरूस्त राहील. झोपण्याआधी तुम्ही हात पाय स्वच्छ करा. हात-पाय अस्वच्छ असतील तर वाईट स्वप्न पडतात, असे सांगितले जाते. त्यामुळे लोक स्वत:शी बोलतात. तसेच तुमचा बेडही निटनेटका ठेवणे गरजेचे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.