तर काय?

माझे वय ४२ वर्षे आहे. मला गेली २२ वर्षे अर्धशीशी अर्थात मायग्रेनचा त्रास होतो. बरीच औषधे केली पण फरक पडत नाही.
migraine
migrainesakal
Updated on

माझे वय ४२ वर्षे आहे. मला गेली २२ वर्षे अर्धशीशी अर्थात मायग्रेनचा त्रास होतो. बरीच औषधे केली पण फरक पडत नाही. वयापरत्वे त्रास कमी होईल असे डॉक्टर म्हणतात पण अजून तरी त्रास कमी झालेला नाही. कृपया मार्गदर्शन करावे....

- विशाखा पवार, पुणे

उत्तर - शरीरात पित्ताचे असंतुलन झाल्यास अशा प्रकारचा डोके दुखण्याचा त्रास होताना दिसतो. आहारातून खूप तिखट, तेलकट गोष्टी वर्ज्य कराव्या. तसेच आहाराच्या वेळा काटेकोरपणे पाळाव्या. यकृताचे कार्य व्यवस्थित असणे पित्तसंतुलनाकरता अत्यंत गरजेचे असते. त्यामुळे बिल्वसॅनसारखे रसायन सकाळ-संध्याकाळ पाण्याबरोबर घेणे सुरू करावे. रोज रात्री झोपण्यापूर्वी सॅनकूल चूर्ण कोमट पाण्याबरोबर घेणे सुरू करावे. सकाळ-संध्याकाळ दोन-दोन संतुलन पित्तशांती गोळ्या, तसेच चमचाभर गुलकंद घेण्याचा फायदा होऊ शकेल.

माझे वय १७ वर्षे आहे. गेली २-३ वर्षे माझ्या डोक्यात १-२ पांढरे केस दिसायला लागले होते. गेल्या सहा महिन्यांत अभ्यासाच्या जागरणामुळे केस पांढरे व्हायचे प्रमाण फारच वाढत चालले आहे. केस काळे राहण्यासाठी काय उपचार करता येतील याचे मार्गदर्शन करावे.

- स्मृती पाठक, पुणे

उत्तर - शरीरातील अस्थिधातू कमकुवत झाला तर अशा प्रकारे कमी वयात केस पांढरे होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे सर्वप्रथम हाडांची ताकद वाढण्यासाठी प्रयत्न करणे उत्तम. याकरता आहारात रोज दूध, लोणी-साखर, दही यांचा समावेश करावा. त्याबरोबरीने शतावरी कल्प, खारकेची पूड घालून उकळून घेतलेले दूध घेणे उत्तम. डिंकाचे लाडू वरचेवर खाणे बरे राहील. सॅन रोझ, मॅरोसॅन घेण्याचा फायदा होऊ शकेल.

केसांना बळकटी मिळण्याच्या दृष्टीने संतुलनच्या पित्तशांती, हेअरसॅन गोळ्या घेण्याचा फायदा होऊ शकेल. त्याचबरोबरीने आठवड्यातून १-२ वेळा संतुलन व्हिलेज हेअर सिद्ध तेलासारखे तेल केसांच्या मुळाशी लावावे व नंतर शक्यतो नैसर्गिक घटकांपासून बनविलेल्या संतुलन सुकेशासारख्या मिश्रणाने केस धुवावे. केस धुण्यासाठी शांपू वापरत असल्यास माइल्ड शांपू वापरणे जास्त बरे. केस कोरडे राहणार नाहीत याची काळजी नक्की घ्यावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.