Brain Health Tips: शरीरावर नियंत्रण ठेवण्यासाठी मेंदू महत्वाचे कार्य करते. शरीराच्या प्रत्येक अवयवाच्या कार्यासाठी सिग्नल पाठवतो आणि आपले शरीर मेंदूच्या निर्देशानुसार कार्य करते. मेंदूशी संबंधित लहान समस्याही तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. मेंदूच्या मज्जातंतूमध्ये कोणत्याही प्रकराचा अडथळा किंवा व्यत्यय आल्याने मेंदूला त्याचे काम करण्यात अडचण येऊ शकते. त्यामुळे मेंदूपर्यत ऑक्सिजन आणि पोषक द्रव्ये पोहोचत नाही आणि मेंदूचे कार्य करणे बंद होते. यामुळे ब्रेन स्ट्रोकची समस्या निर्माण होऊ शकते.