Sleep Disorder: ८ तासाऐवजी ५ तासच झोप घेताय? होईल 'या' गंभीर आजारांचा जीवाला धोका

उत्तम झोप येणे आरोग्यासाठी फार महत्वाचे आहे
Sleep Disorder
Sleep Disorderesakal
Updated on

Disadvantages of less sleeping: दिवसभऱ्याच्या कामातील थकव्यानंतर शरीराला झोप फार आवश्यक असते. मात्र हल्ली कामाचं स्ट्रेस आणि दैनंदिन जीवनातील रोजची घाई बघता अनेकांची आठ तास झोप होत नाही. आणि झोपेच्या अनेक गंभीर समस्या उद्भवतात. ५ तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या मंडळींना झोप न झाल्याने गंभीर आजार उद्भवू शरकतात.

झोप कमी झाली तर होतात हे महत्वाचे तोटे

1) झोप पूर्ण न झाल्याने मेंदूवर नकारात्मक परिणाम होतात. कमी झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते.

2) झोप न झाल्याने तुमचा मेंदू पूर्णपणे थकलेला असतो. त्याचा परिणाम तुमच्या स्वभावातही दिसून येतो. अशावेळी तुम्हाला नैराश्य, चिंता, तणाव आणि मूड बदलणे असे त्रास उद्भवू शकतात. त्यामुळे शरीराला आठ तासांची झोप आवश्यक आहे.

Sleep Disorder
Health: बीयर पिणाऱ्यांचा फायदा तर न पिणाऱ्यांचं नुकसान! तज्ज्ञांचा गजब दावा.. एकदा वाचाच

3) इम्युनिटी कमकुवत होणे

कोरोना काळापासून लोकांच्या प्रतिकारशक्तीवर बराच परिणाम झालायत. अनेकांची तर कोरोना झाल्यानंतर इम्युनिटी कमजोर झालेली आहे.

4) मधुमेहाचा धोका

सध्या मधुमेह हा भारतातच नाही तर जगभरात गंभीर आजार बनला आहे. जर तुम्हाला या आजारांपासून सुटका हवी असेल तर ८ तासांची झोप तुम्ही घ्यायलाच हवी. झोप व्यवस्थित न झाल्याने रक्तातील साखरेची पातळी आणि मधुमेहाचा धोका निर्माण होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.