Healthy Lifestyle म्हणजे फक्त व्यायाम आणि डाएट असतं का? या गोष्टीही असतात फार महत्वाच्या

निरोगी आणि यशस्वी जीवनासाठी हेल्दी लाइफस्टाईल असावी असं सगळे सांगतात. पण म्हणजे काय जाणून घेऊया
Healthy Lifestyle
Healthy Lifestyleesakal
Updated on

Which Things Includes In Health Lifestyle : निरोगी आणि यशस्वी जीवनासाठी हेल्दी लाइफस्टाईल असावी असं सगळे सांगतात. आपण ते ऐकतही असतो. पण हेल्दी जगायचं म्हणजे फक्त नियमीत व्यायम आणि आहार एवढेच असते का? तर नाही. तज्ज्ञ सांगतात आरोग्यपूर्ण आयुष्य जगण्यासाठी अजून बऱ्याच गोष्टींचा अवलंब करणं आवश्यक असतं.

जर तुमची लाइफस्टाईल आरोग्यपूर्ण नसेल तर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात, कार्यक्षमता कमी होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण आरोग्यपूर्ण जीवनशैली म्हणजे काय जाणून घेऊया.

Healthy Lifestyle
Healthy Lifestyleesakal

लवकर झोपणे, लवकर उठणे

आरोग्यपूर्ण जीवनशैली जगण्याची पहिली पायरी म्हणजे रात्री वेळेत झोपून सकाळी लवकर उठणे हे आहे. हल्ली फोन, टीव्ही, पार्टीज अशा कारणांनी रात्री उशिरा झोपण्याची सवय लोकांना लागली आहे. त्यामुळे सकाळी उशीरा उठतात. पण आपली उर्जा लेव्हल सकाळी सर्वाधिक असते. त्यामुळे ती झोपण्यात वाया न घालवता ती वापरावी. यासाठी पाहटे उठणं सर्वोत्तम समजलं जातं. त्यामुळे शरीरात उत्साह आणि सकारात्मकता जाणवते.

व्यायाम करा

सकाळी लवकर उठून व्यायम केल्याने शरीर आणि मन दोन्हीही तंदुरूस्त राहते. त्यामुळे उत्साह जाणवतो. आणि तुम्ही हेल्दी आणि आनंदी राहू शकतात.

Healthy Lifestyle
Healthy Eyes साठी करा ही योगासनं, चष्मा लावण्याची गरज नाही
Healthy Lifestyle
Healthy Lifestyleesakal

पूर्ण झोप घ्या

रात्रीची जागरणं आणि दिवसभर कामाचा ताण याचा आपल्या मनाबरोबर शरीरावरही खूप ताण येतो. त्यामुळे शरीराला आणि मनालाही पूर्ण आराम मिळण्यासाठी पूर्ण ७-८ तासांची झोप होणे आवश्यक असते.

संपूर्ण आहार

आरोग्यासाठी फक्त हेल्दी डाएट घेऊन चालत नाही तर बॅलंस्ड डाएटही घ्यावं लागतं. तुमच्या शरीराला आवश्यक पोषण तत्व योग्य प्रमाणात मिळतात का हे माहित असणं आवश्यक असतं. जर पोषकतत्व कमी पडले तर आजार वाढू शकतात.

Healthy Lifestyle
कॅफेन फ्री Kahwa Tea मुळे अनेक समस्या होतील दूर, जाणून घ्या या Healthy काश्मिरी चहाची रेसिपी
Healthy Lifestyle
Healthy Lifestyleesakal

सकारात्मक रहा

सकारात्मक विचार केल्याने मन आनंदी आणि उत्साही राहतं. पण जर नकारात्मक विचार केला तर त्यामुळे मानसिक व शारीरिक आजार उद्भवतात. त्यामुळे संपूर्ण आरोग्यासाठी सकारात्मक विचारसरणी असणेही फार आवश्यक आहे.

अल्कोहल आणि स्मोकिंग

जर तुम्हाला हेल्दी लाइफस्टाईल स्वीकारायची असेल तर अल्कोहल आणि स्मोकींगला बंद करणे आवश्यक आहे. या दोन्हीचाही शरीरावर विपरीत परिणाम होतो. शिवाय याचे गंभीर परीणामही भोगावे लागतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.