Health Tips News: दुपारचे जेवण जेवल्यानंतर अनेकजण अक्षरशः सुस्तावतात. बसल्या ठिकाणी ही मंडळी डुलक्या घेऊ लागतात. जेवणानंतर झोप येणे हे तर नैसर्गिक आहे, असे म्हणून तुम्ही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष कराल. इथेच तुम्ही मोठी चूक करताय मंडळींनो.
कारण ही बाब नैसर्गिक नसून ही परिस्थिती तुमच्या वाईट सवयींमुळे ओढावतेय, हे लक्षात घ्या. रात्रीचे जागरण, रात्री उशीरापर्यंत काम करणे, पार्टी इत्यादी गोष्टींमुळे तुमचे शरीर थकते. परिणामी कोणत्याही कामामध्ये लक्ष केंद्रित करण्यात अडथळे निर्माण होतात आणि दुपारच्या जेवणानंतरही झोप येऊ लागते.
जाणून घेऊया दुपारच्या जेवणानंतर सुस्ती आल्यासारखे का जाणवते?. प्रोटीनयुक्त पदार्थांचे सेवन केल्यास शरीरात ट्रिप्टोफॅन या अमिनो अॅसिडचे प्रमाण वाढते. ज्यामुळे दुपारच्या जेवणानंतर झोप येऊ लागते.
काही लोक रात्री उशीरापर्यंत ऑफिसचे काम करत बसतात किंवा पार्टी-फिरणे यासारख्या कारणांमुळे जागरण करतात. यामुळे झोप पूर्ण होत नाही. याचे आरोग्यावर नकारात्मक परिणाम पाहायला मिळतात. अपुऱ्या झोपेमुळे आरोग्यासहीत तुमच्या कामावरही दुष्परिणाम होऊ लागतात. म्हणून रात्री वेळेत झोपून सकाळी लवकर उठण्याची सवय लावून घ्यावी.
दिवसभर आपण कोणतेही काम न केल्यास, व्यायाम न केल्यास, शारीरिकरित्या सक्रिय न राहिल्यास दिवसभर आपणास सुस्ती आल्यासारखेच वाटणार. या सर्वांचा तुमच्या कामांवरही परिणाम होणार आहे. त्यामुळे वेळीच आळस दूर करावा. एखाद्या कामामध्ये स्वतःला गुंतवून ठेवावे.
भूक नसतानाही जर आपण वारंवार काही-न्-काही खात असाल तर यामुळे झोप व सुस्ती आल्यासारखे जाणवू शकते. जास्त प्रमाणात खाद्यपदार्थ खाल्ल्यास पचनप्रक्रियेवर परिणाम होतात. कारण अन्नाचे पचन होण्यासाठी पचनसंस्थेला मोठ्या प्रमाणात रक्ताचा पुरवठा करावा लागतो. याचा थेट परिणाम मेंदूवर होतो आणि यामुळे आपल्याला थकल्यासारखेही जाणवते.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.