Habit To Get Up Late Morning : आपले आजी आजोबांसारखे जुने लोकं आपल्याला नेहमी सांगतात की, सकाळी लवकर उठावं. त्यामुळे मन, बुद्धी, शरीर सर्व सुदृढ राहतं. पण हल्ली टीव्ही, फोन, लेट नाइट पार्टीज अशा लाइफस्टाइलमुळे उशीरा झोपण्याची आणि सकाळी उशीरा उठण्याची सवय लागली आहे. अशीच रात्री उशीरापर्यंत जागण्याची सवय मुलांनाही लागत आहे. त्यामुळे सकाळी सहाजिकच लवकर उठण्याचा कंटाळा येतो.
पण तुम्हाला माहितीये का तुमच्या या सवयी तुमच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी फार घातक आहेत.
उशीरा उठल्याने शरीरावर आणि मनावर त्याचा प्रचंड ताण येतो. जाणून घेऊया नुकसान
ताण वाढतो
बऱ्याच काळापर्यंत जर उशीरा उठण्याची सवय कंटिन्यू केली तर मनावर ताण वाढतो. तणावग्रस्त मानसिकता वाढू लागते. यामुळे शरीरात सिरेटोनीन हार्मोन्सची कमतरता जाणवू लागते. यामुळे ताण, एंझायटी सारख्या समस्या होऊ शकतात.
पचन क्षमतेवर दुष्परीणाम
सकाळी उशीरा उठणे किंवा झोपेचे वेळापत्रक बदलणे यामुळे तुमच्या पचन क्षमतेवर त्याचा परीणाम होतो. पचनकार्य हळू होऊ लागते. त्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. म्हणून पचनशक्ती सुरळीत राहण्यासाठी सकाळी लवकर उठणे आवश्यक असते.
लठ्ठपणा वाढतो
सकाळी उशीरा उठण्याच्या सवयीमुळे तुमच्यात स्थुलपणा वाढतो. मेटाबोलिझम स्लो होतं. त्यामुळे शरीरात फॅट गोळा होऊन तुमचा लठ्ठपणा वाढू लागतो.
एकाग्रतेत कमी
सकाळी लवकर उठल्याने शरीरात सकारात्मकता वाढू लागते. त्यामुळे एकाग्रताही वाढते. पण जर सकाळी उशीरा उठण्याची सवय असेल तर आळस वाढतो. कोणत्याही कामात मन एकाग्र करणे कठीण होते.
हृदयाच्या समस्या
सकाळी उशीरा उठणे किंवा खूप जास्तवेळ झोपणे यामुळे हृदयावर ताण येतो. यामुळे डिप्रेशन वाढून ब्लड प्रेशरवरही त्याचा विपरीत परिणाम दिसून येतो. ज्याचा थेट संबंध हृदयाचं आरोग्य बिघडण्याशी होतो.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.