Open Mouth Sleeping Habits : आपल्या पैकी बऱ्याच जणांना झोपेत तोंड उघडं ठेवण्याची सवय असते. त्यामुळे आपल्याला त्याचं फारसं काही विशेष वाटत नाही. पण याकडे दूर्लक्ष करून चालणार नाही. कारण हे एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण ठरू शकते. जाणून घ्या सविस्तर.
तोंड उघडं ठेऊन झोपण्याच्या लक्षणांना स्लीप एपनिया या आजाराशी जोडलं जातं. यात झोपेत श्वास थांबतो. याचं कारण शरीरात असणारे ब्लॉकेजेस आणि कंजक्शन असतं. पण ज्यांना हा आजार नसतो ते पण तोंड उघडं ठेऊन झोपतात असं अनेकदा बघायला मिळालं आहे. सामान्यतः झोपल्यावर ब्लड सर्क्युलेशनमध्ये नाकाच्या भागात रक्त जमा होतं. त्यामुळे नाकात सूज येते. आणि श्वास घेऊ शकत नाही.
याशिवाय अजून काही कारणं आहेत, जाणून घ्या
टेंशन
जास्त टेंशन असणे आणि सतत तणावात राहणे यामुळे दिवसभर आणि रात्री झोपल्यावरही तोंडाने श्वास घेतला जाऊ शकतो. जेव्हा टेंशनमध्ये असतात तेव्हा श्वासाची गती वाढते आणि बीपी वाढतं. त्यामुळे तोंडाने श्वास घेतला जातो.
अॅलर्जी
जर तुमच्या रोगप्रतिकारक शक्ती कमी असेल तर तुम्हाला अॅलर्जी होते. ती बाहेर काढण्यासाठी तोंड उघडून श्वास घेतो.
अस्थमा
अस्थमाच्या रुग्णाच्या लंग्जमध्ये सूज असते. त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला त्रास होतो. यामुळेच घोरतात आणि तोंड उघडून श्वास घेतात.
सर्दी खोकल्याचा त्रास
सर्दी खोकल्यामुळे नाक बंद होते. त्यामुळे शरीरात ऑक्सीजनची कमतरता जाणवते. त्यामुळे तोंडाने श्वास घेतला जातो.
जर तुम्हीही या त्रासातून जात असाल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.