निरोगी राहण्यासाठी योगा करणे आणि पोषक आहार घेणे गरजेचे आहे. तसेच शरीर आणि मानसिक आरोग्य निरोगी ठेवायचे असेल तर पुरेशी झोप घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. सहा किंवा सात तासंपेक्षा कमी झोप झाल्यास विविध आजार उद्भवू शकतात. याशिवाय चिडचिडपणा वाढून कोणत्याही कामात मन लागत नाही. सोशल मिडियावर सध्या जपानमधील एक चर्चेचा विषय ठरला आहे. कराण तो गेले १२ वर्ष दररोज ३० मिनिटे झोप घेत आहे.