Navratri 2024 : नवरात्रीच्या उपवासात सतत पोटात कावळे ओरडायला लागतात?, या गोष्टी पाळा अन् भुकेला टाळा

जेव्हा सतत तुम्ही ९ दिवस उपाशी राहणार असता तेव्हा या गोष्टीचा त्रास होऊ शकतो.
Navratri 2024
Navratri 2024esakal
Updated on

Navratri Vrat Healthy Lifestyle :  

नवरात्रीच्या उपवासाला भारतीय संस्कृतीत खूप महत्त्वाचं स्थान आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात दुर्गादेवीची विशेष पूजा केली जाते. नवरात्रीत अनेक लोक नऊ दिवस उपवास करतात. या उपवासात खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवले जाते. कारण, श्रद्धा म्हणून लोक उपाशी राहतात. पण जेव्हा वर्षभर तुम्ही दररोज जेवत असता, तेव्हा या नऊ दिवसांच्या उपवासाचा त्रास होतो.  

एखादा दिवस उपवास केला तर त्रास होत नाही. पण, जेव्हा सतत तुम्ही ९ दिवस उपाशी राहणार असता तेव्हा या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. कमी खाल्ल्याने आणि उपवास केल्याने शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होते. पण उपवासामुळे कमी खाल्ल्यानेही जास्त भूक लागते.

Navratri 2024
Navratri 2024 : 'मी सहा महिन्याची गर्भवती असताना कोरोनाने संपूर्ण कुटुंबाला गिळंकृत केलं’

अशा परिस्थितीत भूकेवर नियंत्रण ठेवणे कठीण होऊन बसते. चला अशा काही टिप्स पाहूयात, ज्यामुळे, तुमचा उपवास पार पडेल अन् तुम्हाला भूकही फारशी लागणार नाही.

 

भरपूर पाणी प्या (Drink Water)

उपवासाच्या वेळी भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे खूप आवश्यक आहे, ज्यामुळे पोट भरलेले राहते. हे शरीर हायड्रेटेड ठेवते आणि निर्जलीकरण टाळते ज्यामुळे भूक वाढते. पाण्यामुळे पचनक्रिया व्यवस्थित राहण्यासही मदत होते. लिंबू पाणी प्यायल्याने भूकही नियंत्रित राहते. त्यामुळे उपवासाच्या काळात भूक नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसे पाणी पिणे अत्यंत आवश्यक आहे.

Navratri 2024
Nashik Navratri 2024 : जगदंबेच्या चरणी हजारो भाविक लीन! कोटमगावला रमेशगिरी महाराजांच्या हस्ते घटस्थापना, हजारांवर भाविक बसले घटी

फायबर युक्त फळे खा (Eat Fruits)

उपवासाच्या वेळी भूकेवर नियंत्रण ठेवण्यासाठी फायबर युक्त फळांचे सेवन करणे फायदेशीर ठरते. फळांमध्ये आढळणारे फायबर्स पचनक्रिया चांगली ठेवण्यास मदत करतात. फळांचे सेवन केल्याने पोट भरलेले वाटते आणि भूक नियंत्रित राहते. फळे शरीराला हायड्रेट ठेवतात याशिवाय फळांमध्ये आढळणारे व्हिटॅमिन, मिनरल्स आणि अँटीऑक्सिडंट्स शरीरासाठी फायदेशीर असतात. त्यामुळे उपवासात फायबरयुक्त फळांचे सेवन करावे.

प्रक्रिया केलेले अन्न खाऊ नका (Do not eat processed food)

उपवासाच्या वेळी बाजारात उपलब्ध असलेले प्रक्रिया केलेले पदार्थ खाणे टाळावे.  जास्त साखर, मीठ आणि फॅटयुक्त पदार्थ खाणे टाळावे. हे खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढू शकते, ज्यामुळे भूक वाढू शकते आणि जास्त प्रमाणात खाण्याचा धोका वाढू शकतो, असे अभ्यासांनी सिद्ध केले आहे की लठ्ठपणा आणि वजन वाढणे यासारख्या अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

Navratri 2024
Navratri: गावात एकही विवाह सोहळा होत नाही, गावकरी पलंगावर झोपत नाहीत, काय आहे कारण? जाणून घ्या रेणुका मातेच्या प्रसिद्ध मंदिराबद्दल

जास्त वेळ उपाशी राहू नका (Don't stay hungry for too long)

जास्त वेळ उपाशी राहिल्याने शरीरात अशक्तपणा, थकवा, डोकेदुखी यांसारख्या समस्या निर्माण होतात, याशिवाय जास्त वेळ उपाशी राहिल्याने अन्न खाऊनही भूक भागत नाही. त्यामुळे उपवासाच्या वेळी शरीरात ऊर्जेची कमतरता भासू नये म्हणून आपण ठराविक अंतराने काही ना काही कमी प्रमाणात खात राहिले पाहिजे.

Navratri 2024
Navratri 2024 : 'पाळीविषयी बोलताना काहींनी ऐकून घेतलं तर काहींनी गावाबाहेर काढलं' सांगताहेत समाजबंधच्या शर्वरीताई

चांगली झोप घ्या (Have a good sleep)

उपवासाच्या वेळी चांगली झोप घेणे खूप गरजेचे आहे. रात्री उशिरापर्यंत जागृत राहिल्यास जेवायची इच्छा जास्त होते. जर आपण पुरेशी झोप घेतली तर ते मनाला भुकेपासून दूर ठेवण्यास मदत करते. झोप शरीराला विश्रांती देते आणि भूक कमी करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.