Migraine Problem: सातपैकी एका व्यक्तीला मायग्रेनची डोकेदुखी

डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधी घ्या
people suffer from migraine headaches doctor health nagpur
people suffer from migraine headaches doctor health nagpursakal
Updated on

नागपूर : डोकं गरगरतय, अर्ध्या डोक्यात कोणीतरी घणाने वार करीत आहे, डोकं भणभणतय, अशा तक्रारी आपल्या सभोवताली अनेकजण करतात. त्यामागे केवळ झोप हे कारण मायग्रेन हा आजारही असू शकतो. कारण सात व्यक्तींमागो एक जण अर्धशिशी अर्थात मायग्रेनची डोकेदुखी घेऊन जगत आहे, असे जागतिक आरोग्य संघटनेने अलीकडेच प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे.

लक्षणांचे पाच टप्पे

-पहिला टप्पा - जास्त भूक लागणे, मनस्थितीत बदल होणे.

-दुसरा टप्पा - गोंधळून जाणे, मुंग्या येणे, जळजळणे, बधिरता येणे

-तिसरा टप्पा - डोक्याच्या एका किंवा दोन्ही भागात ठसठसणारी असह्य डोकेदुखी, मळमळ व उलटी होणे

-चौथ्या टप्पा - सुस्तपणा व गळल्यासारखे वाटणे, आवाजाचा, प्रकाशाचा त्रास होणे

-पाचवा टप्पा - १ ते ३ दिवसांत पूर्णतः सामान्य स्थितीत येणे

सार्वत्रिक आजार

जगभर १७ कोटी लोक या त्रासाने ग्रस्त राहतात. पुरुषांपेक्षा महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक आहे. याला मेंदूतील काही रासायनिक स्थित्यंतरे कारणीभूत ठरतात. महिलांमध्ये संप्रेरकांची उलथापालथ झपाट्याने होते. त्यामुळे महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते.

अर्धशिशीत डोक्याच्या एका बाजूला भयंकर वेदना होतात. अर्धशिशीचा अटॅक आल्यानंतर व्यक्तीला काहीही सुचत नाही.त्याची अस्वस्थता वाढते. (Latest Marathi News)

people suffer from migraine headaches doctor health nagpur
Migraine: थंडीत मायग्रेनची समस्या वाढते? हे सोपे घरगुती उपाय करून पहा!

आजाराला दूर ठेवण्यासाठी

-झोपायची वेळा ठरवावी

-अनियमित आहार टाळावा

- नियमित व्यायाम करावा

- ताणतणाव व्यवस्थापन

- कॅफेन असलेली पेय टाळणे

- प्रखर उजेडाचे दिवे टाळावे

- गॉगल्सचा वापर करावा

मेंदूमधील सिरोटोनीन रासायनिक द्रव्याची पातळी कमी होते. न्युरोपेप्टाइड, सीजीआरपीसारखी काही दाहक रासायनिक द्रव्ये तयार होतात. मेंदूतील रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंवर परिणाम होतो, त्यामुळे मायग्रेनचा त्रास सुरू होतो.

रजोनिवृत्तीच्या काळात महिलांमध्ये हार्मोनल बदलांमुळे हा त्रास होतो. अर्धशिशीवर डोकेदुखीचे औषध थेट फार्मसीतून घेण्याऐवजी डॉक्टरांचा सलफ्ला घ्यावा.

-डॉ.चंद्रशेखर मेश्राम, मेंदूरोग तज्ज्ञ, नागपूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.