Power Nap Benefits : ऑफिसमधील 10 मिनिटांची डुलकी ठरेल आरोग्यदायी

आजच्या व्यस्त जीवनशैलीत ताणतणाव आणि थकवा येणे हे सामान्य आहे.
Power Nap
Power NapSakal
Updated on

Power Nap Benefits : आजच्या व्यस्त जीवनशैलीत ताणतणाव आणि थकवा येणे हे सामान्य आहे. तुम्हालाही सतत काम करून कंटाळा आला असेल, तर कामादरम्यान 10 मिनिटांची डुलकी तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. आज आपण पॉवर नॅप घेण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.

Sleep
Sleep
Power Nap
Health: उत्तम आरोग्य आणि उत्तम चव देणारे नाचणीचे लाडू कसे तयार करायचे?

डुलकी घेण्याचे फायदे

  • कामादरम्यान 10 मिनिटांची डुलकी काढल्याने थकवा दूर होतो आणि ताजेतवाने वाटते. यामुळे काम करण्याची शक्ती वाढते आणि स्मरणशक्ती दाणगी होते.

  • हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या मते, 30 मिनिटांपेक्षा जास्त वेळ डुलकी घेऊ नये. असे केल्याने ताजेतवाने वाटण्याऐवजी थकवा जाणवू शकतो. त्यामुळे साधारण कामादरम्या 10 मिनिटे डुलकी घ्यावी.

  • विली ऑनलाइन लायब्ररीच्या संशोधनानुसार, डुलकी घेतल्याने जलद शब्द शिकण्यास मदत होते. स्मरणशक्ती वाढते. त्यामुळे विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता विकसित होते.

Power Nap
सौंदर्याचं नव्हे, तर नखांचंही आरोग्य जपा; फॉलो करा Homemade tips
  • छोटी डुलकी घेतल्याने रक्तदाबाचा भास कमी होतो. अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीमध्ये प्रकाशित झालेल्या एका संशोधनानुसार पॉवर नॅपमुळे रक्तदाब कमी होण्यास मदत होते. त्यामुळे रक्तदाबाचा त्रास कमी करण्यासाठी छोटीशी पॉवर नॅप फायदेशीर ठरू शकते.

  • डुलकी घेण्याचा आणखी एक फायदा म्हणजे यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते. तसेच कामामुळे आलेला ताण दूर होतो. डुलकी घेतल्याने तणाव वाढवणारे हार्मोन्स नियंत्रित राहतात.

  • डुलकी घेतल्याने शरीराचा थकवा दूर होतो, त्यामुळे सतर्कता वाढते. डुलकी घेतल्याने मज्जातंतूंना आराम देते, ज्यामुळे हृदयाची कार्य क्षमता वाढते. डुलकी घेतल्याने व्यक्तीचा मूड, काम करण्याची शक्ती आणि कार्यक्षमता सुधारते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.