माझी मुलगी १५ वर्षांची आहे. तिच्यावेळच्या गरोदरपणात मला बरेच त्रास होते, कुटुंबात भांडणेही होती. मी सतत मानसिक ताणाखाली असे, मला रात्रीची झोप येत नसे, घरातील वातावरणामुळे सतत रडणे, दुःखी राहणे वाट्याला आले. गेली २-३ वर्षे मुलीच्या स्वभावात अशाच प्रकारचे बदल होत आहेत. ती छोट्या-छोट्या गोष्टींवरून चिडते, रागावते, अपसेट होते, सांगितलेले ऐकत नाही. याबद्दल मला अपराधी असल्यासारखे वाटते. कारण आई-वडिलांच्या आणि कुटुंबाच्या प्रत्येक गोष्टीचा प्रभाव मुलांच्या मानसिकेवर होतो, असे मी श्रीगुरू डॉ. बालाजी तांबे यांच्या ‘गर्भसंस्कार ’या पुस्तकात वाचलेले आहे. आता काय करता येईल, यासाठी मार्गदर्शन करावे.
- दीपाली बाबर, बेलापूर