प्रश्न १ - मी कॉलेजमध्ये प्राध्यापक आहे, त्यामुळे मला सतत वाचन करावे लागते, तसेच बरेच तास संगणकावर काम करावे लागते. रात्रीचे जागरण, सकाळी लवकर उठणे या सगळ्यांमुळे झोप व्यवस्थित होत नाही, त्यामुळेच कदाचित माझे डोळ सतत कोरडे असल्याचे जाणवते. ड्रॉप्स घालण्याचा फारसा उपयोग होताना दिसत नाही. कृपया उपाय सुचवावा.
- मालती नाडकर्णी, नवी मुंबई
उत्तर - संगणकावर काम, स्क्रीनचा वापर तसेच वाचन करण्यामुळे डोळ्यांमध्ये कोरडेपणा येणे स्वाभाविक असते. यासाठी रोज न चुकता संतुलन सुनयन तेलासारखे एखादे तेल डोळ्यांमध्ये घालावे. नाकात नस्यसॅन सिद्ध घृतासारखे सिद्ध घृत नियमित घातल्यामुळे इंद्रियांच्या जागी असणारा कोरडेपणा कमी व्हायला मदत मिळू शकेल. रात्री झोपताना संतुलन पादाभ्यंग घृत वापरून पादाभ्यंग करण्याचाही फायदा होऊ शकेल.
जमत असल्यास रोज अनाशेपोटी एक चमचा संतुलन सुनयन घृत घेणे सुरू करावे, वरचेवर आयुर्वेदिक नेत्रबस्ती करून घेण्याचाही फायदा मिळू शकेल. रात्री झोपताना डोळ्यांवर गुलाबपाण्याच्या घड्या ठेवाव्यात, जेणेकरून उष्णता कमी होऊन कोरडेपणा कमी व्हायला हातभार लागू शकेल.