Ghost Science : रात्री हातपाय गार पडलेत, बेडरूममध्ये भूत आल्यासारखं वाटतंय? घाबरू नका! ही आहेत वैज्ञानिक कारणं

Sleep Paralysis : कधी कधी रात्री अचानक जाग येते, आणि यावेळी शरीरात जीव नसल्याचा भास होतो..
Ghost Science Sleep Paralysis
Ghost Science Sleep ParalysiseSakal
Updated on

अनेकदा तुम्ही टीव्ही मालिका आणि चित्रपटांमध्ये भुताच्या गोष्टी पाहिल्या असतील. पण तुम्हाला कधी घरात भुताचे अस्तित्व जाणवले आहे का? एखादा विश्वास ठेवेल किंवा ठेवणार ही नाही पण बऱ्याचदा झोपेत आपल्या आजूबाजूला भूत आहे असं आपल्याला वाटतं.

आता भूत अस्तित्वात आहे की नाही हा वादाचा विषय आहे आणि तो संपता संपत नाही. पण लोकांनी या प्रश्नाचं उत्तर विज्ञानात शोधण्याचा प्रयत्न केला. 'डेली मेल'च्या वृत्तानुसार शास्त्रज्ञांनी भूत किंवा भ्रम वाटण्याची 5 कारणे सांगितली आहेत.

Ghost Science Sleep Paralysis
Dogs Cry at Night : कुत्र्यांना भूत दिसतं म्हणून ते रात्रीच रडतात का, काय आहे कारण?

खराब वातावरण आहे कारण

हवेच्या खराब गुणवत्तेमुळे भूत दिसतं असं शास्त्रज्ञांचं मत आहे. खरंतर, खराब हवेमुळे भिंतींवर काळा साचा निर्माण होतो. याला टॉक्सिक मोल्ड म्हणतात. जुन्या इमारतींमध्ये हे अनेकदा दिसून येतं. अशा घरांमध्ये श्वास घेण्याचा थेट परिणाम मनावर होतो. त्यामुळे मूड स्विंग्स देखील होतात. कधीकधी आपल्याला खूप राग येतो आणि स्मरणशक्तीही कमी होऊ लागते तर कधी चिंता आणि भीती देखील वाटते.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, ही सर्व लक्षणं त्या लोकांमध्येही दिसून आली आहेत, ज्यांना भूत खरं आहे असं वाटतं. न्यूयॉर्कच्या क्लार्कसन युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर शेन रॉजर्स सांगतात की, भुताटकी संबंधित अनेक प्रकरणांचा अनुभव हा 'टॉक्सिक मोल्ड' मधील लोकांच्या अनुभवासारखाच आहे. (Health News)

कार्बन मोनॉक्साइड

कार्बन मोनॉक्साईड (CO) आणि भूतांच्या उपस्थितीची जाणीव यांच्यातील संबंध दुसऱ्या महायुद्धापासून दिसून येत आहे. 1921 मध्ये, अमेरिकन जर्नल ऑफ ऑप्थाल्मोलॉजी मध्ये एका महिलेच्या भयानक अनुभवाचं वर्णन दिलेलं आहे. ही महिला 'मिसेस एच' म्हणून ओळखली जात होती.

Ghost Science Sleep Paralysis
Online Shopping : ऑनलाईन विकलं जातंय भूत शोधण्याचं मशीन; काय आहे प्रकरण?

ही महिला कुटुंबासह नवीन घरात शिफ्ट झाली की तिला तिथे आवाज ऐकू यायचा. झोपेत असताना तिला कोणीतरी पकडून ठेवल्याचा भास व्हायचा. तिला अशक्तपणा जाणवत होता, डोकेदुखीचीही तक्रार होती. हा सर्व प्रकार कार्बन मोनॉक्साईडच्या विषबाधेमुळे होत असल्याच तपासात समोर आलं.

हा विषारी वायू गंधहीन असतो. हवेत कमी प्रमाणात असूनही तो अधिक धोकादायक ठरू शकतो. हे बर्‍याचदा गॅस आणि प्रोपेन, तसेच लाकूड-जाळणारे व्हेंट्स आणि न उघडलेल्या चिमणी यांसारख्या बर्निंग इंधनाद्वारे तयार होतात.

'मिसेस एच'च्या बाबतीत सांगायचं तर हा वायू भट्टीतून बाहेर आला होता. संशोधनानुसार, 6 आठवड्यांपेक्षा जास्त काळ या वायूच्या संपर्कात राहिल्यास नैराश्य, चिंता अशी लक्षणं दिसू शकतात.

Ghost Science Sleep Paralysis
Crime News : भूत बनून त्रास देणारी गर्लफ्रेंड! बॉयफ्रेंडने सांगितली भयानक आपबीती

पॅरेडोलिया

कोणत्याही गोष्टीचा आकार पाहणे किंवा त्या वस्तूचा अर्थ शोधणे याला पॅरिडोलिया म्हणतात. उदाहरणार्थ, कित्येकांना ढगांमध्ये वेगवेगळे आकार दिसतात. किंवा मग, चंद्राकडे बारकाईने पाहिल्यास त्याच्या पृष्ठभागावर कुणाला सशाचा आकार दिसेल, तर कुणाला चंद्र भाकरीसारखा दिसू शकतो.

इजिप्तमधील टांता विद्यापीठात 82 लोकांवर एक अभ्यास करण्यात आला. यादरम्यान त्यांना काही नमुन्यांची छायाचित्रे दाखविण्यात आली जी टेलीव्हिजन स्टॅटिक सारखी दिसत होती. यामधील कित्येकांनी या स्टॅटिक्समध्ये मानवी चेहरा दिसल्याचं सांगितलं. असा चेहरा ज्यांना दिसला, त्यातील बहुतांश लोकांनी काही दिवसांपूर्वीच एखाद्या जवळच्या व्यक्तीला गमावलं होतं.

याचं आणखी सोपं उदाहरण म्हणजे, तुमच्या रुममधील खुर्चीवर असणारे कपडेच घ्या. कपड्यांचा हा ढीग उजेडात पाहिल्यास काही वाटत नाही, मात्र अंधारात हेच अचानक पाहिलं तर खुर्चीवर कोणीतरी बसल्याचा आभास निर्माण होऊ शकतो. हेच खुंटीवर टांगलेले कपडे किंवा पडद्यांच्या बाबतीत देखील होतं, आणि लोक यांना भूत समजतात.

Ghost Science Sleep Paralysis
Diwali Travel : ऐकावं ते नवलंच! दिवाळीत 'या' ठिकाणी साजरा होतो 'भूतांचा उत्सव'; पहा कुठे पहायला मिळेल भूत?

स्लीप पॅरालिसिस

कधी कधी रात्री अचानक जाग येते, आणि यावेळी शरीरात जीव नसल्याचा भास होतो. तुम्हाला तुमचं साधं बोटही हलवता येत नाही असं वाटतं. तुम्हाला ओरडायचे आहे पण करू शकत नाही, मन काम करत असतं पण शरीरात हालचाल नसते. तुम्हालाही असं होत असेल, तर तुम्ही एकटे नाहीये. ही गोष्ट अनेकांच्या बाबतीत घडते. याला स्लीप पॅरालिसिस म्हणतात. अशा वेळी आपल्याला अनेकदा भयानक स्वप्नंही पडत असतात.

आपली झोप ही दोन टप्प्यांमध्ये असते, एक - नॉन रॅपिड आय मूव्हमेंट (NREM) आणि दुसरी रॅपिड आय मूव्हमेंट (REM). जेव्हा तुम्ही दुसऱ्या टप्प्यावर पोहोचता, तेव्हा झोप अधिक खोल असते. यादरम्यान मन शरीराला आराम देते, जेणेकरून गाढ झोपेत स्वप्न पाहताना तुम्ही त्यांच्यावर प्रतिक्रिया देत नाही. अनेक वेळा हलकी झोप काही सेकंदांसाठी खंडित झाली तरी शरीर रिलॅक्स राहते.

कित्येक लोकांना यावेळी हॅल्युजिनेशन्स, म्हणजेच भ्रम देखील होतो. यामुळे त्यांना वेगळा अनुभव येतो आणि तो खरा वाटतो. 2015 मध्ये एका महिलेने आपला याबाबतचा अनुभव शेअर केला होता. तिने सांगितले, की जेव्हा ती तिच्या पतीसोबत झोपली होती, तेव्हा तिला असे वाटले की कोणीतरी तिच्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हटले – मला थंडी वाजत आहे, मी येथे झोपू का? महिलेला वाटले की आपली मुलगी खोलीत आली आहे आणि हे सर्व सांगत आहे. पण जेव्हा महिलेने डोळे उघडले तेव्हा तिला तिचा मुलगा दिसला, ज्याचा काही महिन्यांपूर्वी मृत्यू झाला होता.

ही संपूर्ण घटना स्लीप पॅरालिसिस अटॅक आणि हॅल्युजिनेशन्स या दोन्हीचं उत्तम उदाहरण आहे. या महिलेला तिचा मृत मुलगा दिसला, मात्र तो केवळ एक भ्रम होता. कित्येक वेळा लोक यालाच भूत समजतात.

Ghost Science Sleep Paralysis
Deandra Dottin : WPL मध्ये भुताटकी; वेस्ट इंडीजच्या अष्टपैलू खेळाडूला रात्रीत घरी पाठवलं, काय आहे गौडबंगाल?

एक्सप्लोडिंग हेड सिंड्रोम

हा एक अतिशय धोकादायक विकार आहे. यामध्ये एखाद्या व्यक्तीला अचानक खूप मोठा आवाज ऐकू आल्यासारखे वाटते. हा आवाज एखाद्याच्या किंचाळण्याचा, स्फोटाचा किंवा गोळीबाराचाही असू शकतो. सहसा गाढ झोपेतून उठल्यावर अचानक हा आवाज ऐकू येतो. जेव्हा हे घडतं, तेव्हा लोकांना भीती वाटते.

लंडनच्या गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर ख्रिस फ्रेंच यांच्या मते, एक्सप्लोडिंग हेड सिंड्रोम असलेल्या 44% लोकांना भीती वाटते. जगभरातील लोकसंख्येच्या अर्ध्या प्रमाणात लोक आयुष्यात एकदा तरी एक्सप्लोडिंग हेड सिंड्रोमचे शिकार ठरतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()