Sleep After Lunch-Dinner : जेवणानंतर लगेच झोपता? ही सवय लगेच सोडा नाहीतर..

जेवल्यानंतर तातडीने झोपल्यास अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही.
Sleep Before Lunch-Dinner
Sleep Before Lunch-Dinneresakal
Updated on

Sleep Before Lunch-Dinner : जेवल्यानंतर तीन तासानंतरही आपल्याला झोप येत नसेल तरीही अनेकजण दुर्लक्ष करतात. तर काहींना जेवण झाले की, लगेचच झोपण्याची सवय असते. या दोन्ही आपल्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहेत. जेवणानंतर लगेच झोपायची सवय अनेक आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. त्यामुळे जेवणानंतर दोन तीन तासांनी झोपी जावे, तेही रात्री दहा वाजतापूर्वी, असे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी नोंदविले आहे. जेवल्यानंतर तातडीने झोपल्यास अन्नाचे योग्य पद्धतीने पचन होत नाही.

यामुळे शरीरात एक विशिष्ट प्रकारचे आम्ल तयार होते आणि ते छातीत जाते. जेवल्यानंतर लगेच झोपी गेल्यानंतर शरीरातील कॅलरीज योग्य पद्धतीने बर्न होत नाहीत. जेवढं खातो त्यापेक्षा जास्त शरीरातील कॅलरीज बर्न करणे आरोग्यदायी आहे. यामुळे शरीराचे कार्य उत्तम राहण्यास मदत होते.

जेवणानंतर लगेच झोपी गेल्यास

पचनक्रिया बिघडते

रक्तदाब वाढण्याची शक्यता

रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते

हृदयावर परिणाम होण्याची शक्यता

वजन वाढण्याची जोखीम

Sleep Before Lunch-Dinner
Dinking Water Before Sleeping : झोपण्यापूर्वी भरपूर पाणी पिता का? पित असाल तर आजच थांबवा..

हे लक्षात घ्या

जेवण्यापूर्वी चहा : चहामध्ये कॅफीन असते. त्यामुळे जेवणापूर्वी चहा न पिणे हेच योग्य आहे.

जेवणानंतर चहा : जेवणानंतर चहा प्यायल्याने पोटातील गॅस बाहेर येते. पचन तंत्र सुधारते. मात्र ग्रीन टी, हर्बल टी असावे. आल्याचा चहा असावा.

जास्त झोप घेतल्यास : आळस निर्माण होतो.

कमी झोप घेतल्यास : चिडचिड, निरुत्साहीपणा निर्माण होतो.

जेवणात सुस्ती आणणारे पदार्थ खाल्यास : कोलेस्ट्रेरॉलला आपोआपच आमंत्रण मिळते

Sleep Before Lunch-Dinner
Health Tips.....या एका मसाल्यामुळे मूळव्याधीच्या समस्या होतील कमी, असं करा सेवन

जेवण आणि झोपण्यामध्ये किमान एक ते दोन तासांचे अंतर असायला हवे. यामुळे वजन वाढण्याचा धोका कमी होतो, शिवाय आरोग्यालाही फायदेशीर ठरते. या मधल्या एक-दोन तासांमध्ये पचनप्रक्रिया सुरळीत पूर्ण होते. (health)

जेवल्यानंतर तातडीने झोपल्यास पित्ताचा त्रास होण्याची शक्यताही आहे. झोपण्याच्या तासभर आधी टीव्ही, मोबाईल हातापासून दूर करावे.कोणताही विचार मनात न आणता रात्री दहापूर्वी खाटेवर जावे.

- डॉ.शांतीदास लुंगे,

अध्यक्ष, नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन (निमा), नागपूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.