Sleep Talking : झोपेत बोलण्याचं अध्यात्माशीही आहे कनेक्शन, कदाचित पितरांशी...

बऱ्याच लोकांना झोपेत बोलण्याची, बडबडण्याची सवय असते.
Sleep Talking
Sleep Talkingesakal
Updated on

Sleep Talking Habit Connection To Spirituality : तुम्ही बऱ्याचदा झोपेत लोक बोलतात याविषयी ऐकलं किंवा बघितलं असेल. ही ती स्थिती असते जेव्हा लोक आपल्या पुर्ण शुद्धीत नसतात आणि बडबडतात. ते झोपेत काय बोलत आहेत हे कधी स्पष्ट असतं तर कधी समजत नाही.

मानसशास्त्रज्ञांच्या मते झोपेत बोलणे यामुळे शारीरिक धोका तर नसतो पण त्या व्यक्तीच्या मानसिक स्थितीविषयी ते बोलत असते.

Sleep Talking
Sleep Talkingesakal

काय सांगतो अभ्यास?

विविध अभ्यासातून हे समजलं आहे की, ती व्यक्ती तिप्पट जास्त नकारात्मक बोलतो आणि ८०० पट जास्त दुसऱ्याला वाइट बोलत असतो. पण ही समस्या अशा लोकांमध्ये जास्त आढळते जे आधिच मानसिक आजारातून जात असतात.

अध्यात्मिक बाजू

आधी तुम्हाला मानशास्त्रिय बाजू सांगितली. पण अध्यात्मिक जगतातही झोपेत बोलण्याच्या समस्येला लक्षात घेतले गेले आहे. यात मानलं गेलं आहे की, झोपेत बोलणं हे तुमच्या सबकाँशियस माइंडमध्ये काय सुरू आहे ते सांगते. मुख्यतः तुमच्या वैयक्तिक आयुष्याविषयी सांगते. यातून प्रेम, भीती आणि दाबलेल्या भावना व्यक्त होत असतात. अध्यात्माला याला कसे डील केले जाते बघुया.

Sleep Talking
Sleep Talking : झोपेत बोलण्याची सवय विनोद नव्हे, असू शकतं या गंभीर आजाराचं लक्षण
Sleep Talking
Sleep Talkingesakal

आयुष्यात पुढे जायला तयार आहात

तुम्ही तुमच्या आयुष्यात अनेक गोष्टींचे प्लॅनिंग केलेले असू शकते. पण ते करावे की, नाही या संभ्रमात आहात. झोपेत त्याविषयी बोलणे म्हणजे आता ते कृतीत आणण्याची वेळ आली आहे असा संकेत समजला जातो. लकरच याविषयी तुम्हाला उत्तम संधी मिळणार आहे.

दाबलेल्या भावना बाहेर पडत आहेत

जेव्हा तुम्ही झोपेत असतात तेव्हा सगळ्या भावनांना, आत चाललेल्या विचारांना तुम्ही बाहेर काढू शकत नाहीत. तुम्हाला वाटतं असं करणं तुम्हाला अडचणीत आणेल. किंवा त्या व्यक्त करण्यास कंफर्टेबल नसतात. पण झोपेत तुमचे फक्त सबकाँशियस माइंडच काम करत असते. अशात तुम्ही त्या सर्व गोष्टी सांगण्याचा प्रयत्न करतात ज्या आजवर मनात दाबून ठेवलेल्या असतात.

Sleep Talking
Self Talk : स्वतःशी बोलणं वेडेपणाचं नाही तर आरोग्यासाठी फायद्याचं, संशोधनातून सिध्द
Sleep Talking
Sleep Talkingesakal

पितरांशी बोलणे

असं मानलं जातं की मृत पूर्वजांशी (पितरांशी) संपर्क साधण्यासाठी चांगल्या झोपेचे मोठे योगदान असते. ही ती वेळ असते जेव्हा तुम्ही ब्रह्मांडाच्या दुसऱ्या आयामपर्यंत पोहचण्यासाठी यशस्वी बनवतात. अध्यात्माच्या दृष्टीने बघावे तर यावेळी तुम्ही एखाद्या समस्येच्या समाधानासाठी कोणाच्या मार्गदर्शनासाठी पूर्वजांशी संपर्क साधत असतात.

इच्छांना ब्रह्मांडीय शक्तींपर्यंत पोहचवण्याची वेळ

इच्छा, महत्वकांक्षा सगळ्यांनाच असते. झोपेत बोलण्याचा अर्थ हा पण असतो की, तुम्ही आपल्या इच्छा पुर्ण करण्यासाठी ब्रह्मांडीय शक्तींच्या सहकार्याची अपेक्षा करतात. तुम्ही त्या शक्तींना सांगू पाहत असतात की, लवकर त्या इच्छा पुर्ण करा, ज्यांना तुम्ही बऱ्याच काळापासून पूर्ण करू पाहत आहात. झोपेत त्याच इच्छा व्यक्त होतात ज्या तुम्हाल खूप मनापासून हव्या असतात.

समांतर ब्रह्मांडाची यात्रा

विज्ञान आणि अध्यात्म दोन्हीतही समांतर ब्रह्मांड म्हणजेत पॅरेलल युनिव्हर्सच्या संकल्पनेला स्वीकारलं गेलं आहे. याचा अर्थ या सृष्टीत फक्त आपणच नाही आहोत. आपल्यासारखे इतरही ब्रह्मांड आहेत. झोपेत आपण त्या पॅरेलल ब्रह्मांडाची यात्राही करू शकतो. जर तुम्ही अध्यात्मिकदृष्ट्या प्रगत असाल तर असे करणे शक्य आहे.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.