Afternoon Habits मुळे तुमचं आयुष्य वाढेल, काय आहे अभ्यासकांचा दावा

घरी असलेल्या गृहिणी असो किंवा ऑफिस किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असलेले पुरुष आणि महिला सर्वांनीच दुपारी काही सवयींकडे लक्ष दिल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल
दुपारच्या चांगल्या सवयी
दुपारच्या चांगल्या सवयीEsakal
Updated on

निरोगी आणि दीर्घायुष्य लाभावं अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. यासाठी खास करून पौष्टिक आहार आणि व्यायामाकडे Exercise लक्ष देणं गरजेचं आहे. Some Good Habits in the afternoon to keep your health and mind fresh

अनेकजण निरोगी Healthy राहण्यासाठी योग्य वेळी उठणं आणि य़ोग्य वेळी झोपण्यासोबतच Sleep सकाळ आणि रात्री झोपण्यापूर्वी आरोग्यासाठी चांगल्या किंवा योग्य अशा अनेक गोष्टी करण्यावर भर देतात.

सकाळी उठल्यानंतर किंवा झोपण्यापूर्वी हेल्दी हॅबिट्स Healthy Habits म्हणजेच काही चांगल्या सवयी किंवा गोष्टी करणं आरोग्यासाठी फायद्याचं ठरतं. मात्र अनेकजण दुपार ही महत्वाचं नसल्याचं समजून दुपारच्या सवयींकडे दुर्लक्ष करतात.

मात्र आरोग्य तज्ञांच्या मते दुपारच्या वेळेतही Afternoon जर तुम्ही काही चांगल्या सवयी किंवा कृतींमुळे तुमचं आरोग्य निरोगी राहण्यास आणि तुमचं आयुष्य वाढण्यास मदत होवू शकते.

घरी असलेल्या गृहिणी असो किंवा ऑफिस किंवा इतर कामांमध्ये व्यस्त असलेले पुरुष आणि महिला सर्वांनीच दुपारी काही सवयींकडे लक्ष दिल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल.

मित्र-परिवारासोबत दुपारचं जेवण

ऑफिस किंवा कामाच्या ठिकाणी अनेकजण एकटेच दुपारचं जेवण करणं पसंत करतात. किंबहुना कामाच्या व्यापामुळे टेबलवरच एकाबाजूला काम करतात करतात घाई-गडबडीत जेवणं उरकतात. त्याऐवजी आपल्या सहकाऱ्यांसोबत एकत्रित दुपारचं जेवण करा. यावेळी ऑफिस किंवा कामाच्या विषयांवरील चर्चा टाळा.

नियमितपणे दुपारचं जेवणं योग्य वेळेत आणि सहकाऱ्यांसोबत केल्यास ताणताण कमी होवून पुन्हा पुढील काम करण्यास तुम्हाला फ्रेश वाटेल. तसंच गृहिणींनी देखील घरातील काम उरकण्याच्या गडबडीत दुपारच्या जेवणाची वेळ चुकवू नये. मुलांसोबत किंवा घरातील इतर सदस्यांसोबत दुपारच्या जेवणाची मजा लुटा.

हे देखिल वाचा-

दुपारच्या चांगल्या सवयी
Health Tips: वाढणारं वजन कमी करणार आले, पोटाचा घेर होणार कमी

चालण्यासाठी थोडा वेळ द्या

कार्यालयात तासनतास बसल्याने अलिकडे पाठीच्या, कंबरेच्या तसंच पायांच्या अनेक समस्या वाढू लागल्या आहेत. यासाठीच जेवणानंतर किंवा दुपारीच्या वेळेत थोडा वेळ काढून ऑफिसच्या परिसरातच छोटासा वॉक घ्या.

तसंच गृहिणी किंवा घरी असलेल्यांनी देखील सकाळच्या वेळी वॉक करणं शक्य नसल्यास दुपारच्या वेळी वॉक करणं किंवा एखाद्या अॅक्टिव्हिटीजचा भाग होणं अशा सवयी लावा.

एक डुलकी तुम्हाला करेल फ्रेश

सकाळी उठल्यापासून घरातील कामं किंवा प्रवास आणि त्यानंतर ऑफिसमधील कामाचा ताण यामुळे दुपारच्या वेळी झोप येऊ शकते. अशावेळी तुम्हाला शक्य असेल तर १५-३० मिनिटांची एक डुलकी म्हणजेच छोटीशी झोप काढा.

यामुळे तुम्हाला फ्रेश वाटेल आणि पुन्हा काम करण्याची एनर्जी मिळेल. तज्ञांच्या मते दुपारच्या काही मिनिटांच्या झोपेमुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.

दुपारच्या वेळी वाचन करा

वाचनामुळे अर्थातच तुमच्या ज्ञानात भर पडते. मात्र, मानसिक आरोग्य चांगलं राखण्यासाठी देखील वाचनाची मदत होते. दुपारच्या वेळी जर तुमंच कामामध्ये लक्ष लागत नसेल त्यावेळी किंवा शक्य असल्यास वाचनासाठी १५-२० मिनिटांचा तुम्ही ब्रेक घ्या. तुमच्या आवडीचं एखादं पुस्तक वाचा. यामुळे काही वेळ कामाचे किंवा इतर विचार बाजूला राहतील आणि ताण-तणाव कमी होण्यास मदत होईल.

ताण-तणावाचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होत असतो. यासाठीच तणाव कमी करण्यासाठी काही सवयी लावल्यास तुमचं आरोग्य चांगलं राहून आयुष्य वाढण्यास मदत होईल.

हे देखिल वाचा-

दुपारच्या चांगल्या सवयी
Health Checkup : रेग्युलर हेल्थ चेकअप करणे का महत्वाचे आहे माहितीये? जाणून घ्या एक्सपर्ट्सकडून

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.