Health Tips : आपल्याला उद्भवणाऱ्या अर्धापेक्षा जास्त आजारांमागे कारणीभूत असतात त्या आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी. तुम्ही हेल्दी डाएट घेत असाल तरच त्याचा शरीराला फायदा होतो नाही तर चुकीच्या वेळी चुकीच्या गोष्टी खाल्ल्याने त्या शरीरासाठी व्यर्थ ठरतात. रात्री झोपण्याआधी या काही गोष्टी खाल्ल्यास त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. तेव्हा झोपण्यापूर्वी कुठल्या गोष्टी खाव्यात आणि कुठल्या खाऊ नये याबाबत आपण सविस्तर जाणून घेऊया.
बहुतांश लोक रात्रीच्या जेवणात भरपेट जेवण करतात आणि उशीरा रात्रीपर्यंत मद्यपान करतात. असे केल्याने तुम्हाला झोप तर चांगली येईल मात्र तुमच्या पचनशक्तीवर त्याचा नकारात्मक प्रभाव पडेल. तेव्हा हे काही पदार्थ झोपण्यापूर्वी अजिबात खाऊ नये.
मसालेदार, जास्त पाणी किंवा कॅफिनयुक्त पदार्थ रात्री खाऊ नयेत कारण त्याचा झोपेवर परिणाम होतो तसेच पोटात अॅसिड आणि गॅस निर्माण होऊन पोट खराब होऊ शकतं. जर तुम्हाला तुमचे पोट थंड ठेवायचे असेल आणि चांगली झोप घ्यायची असेल, तर तुम्ही झोपण्यापूर्वी खाली नमूद केलेल्या गोष्टी खाणे टाळावे.
हेवी फूड
क्लीव्हलँड क्लिनिकने अहवाल दिला की हेवी फूड पचायला जास्त वेळ लागतो. रात्री हाय फट्स असलेले आणि तेलकट अन्न खाल्ल्याने अपचन होऊन झोपेचा त्रास होऊ शकतो. रात्री चीझ-बर्गर किंवा तळणाचे पदार्थ आणि मांस खाणे टाळा.
कॅफिन
चहा, कॉफी आणि सोडा यासारख्या गोष्टींमध्ये कॅफिन आढळते. आइस्क्रीमध्येसुद्धा कॅफिन आढळते. अशा गोष्टींचे सेवन केल्याने झोपेचा त्रास होतो. हे पदार्थ पोटात मोठ्या प्रमाणावर अॅसिड निर्माण करतात.
गोड पदार्थ
रात्री झोपण्यापूर्वी गोड पदार्थ खाणे टाळावे. त्यामुळे तुमचं ब्लड शुगर वाढू शकते. तसेच रात्री कँडी किंवा मिठाई खाल्ल्याने तुमची झोप मोड होऊ शकते.आणि तुम्हाला अॅसिडिटीचा त्रासही होऊ शकतो.
टायरामाइन- रिच फूड
तुमच्या झोपेत अडथळा येऊ नये यासाठी झोपण्याआधी टायरामाइनयुक्त जेवण जेवणे टाळावे. यात असलेले अमिनो अॅसिड मेंदूला उत्तेजित करत तुमची झोप उडवण्याचे काम करते. टोमॅटो, सोया सॉस, वांगी, रेड वाइन यांसारख्या गोष्टींमध्ये अमिनो अॅसिड मोठ्या प्रमाणात असते.
मसालेदार पदार्थ
रात्रीच्या जेवणात किंवा झोपण्यापूर्वी अधिक मसालेदार पदार्थ खाल्ल्याने पोटात अॅसिडिटीचे प्रमाण वाढते. यामुळे तुमच्या झोपेवरही परिणाम होतो. असे खाद्यपदार्थ सकाळी किंवा दुपारच्या वेळेत खावे.
दारू
बरेच लोक रात्री झोपण्यापूर्वी बियर पितात कारण असे केल्याने झोप चांगली येते असे त्यांना वाटते. याने तुम्हाला झोप तर चांगली येईल मात्र त्याचे गंभीर परिणाम तुमच्या आरोग्यावर होतील. तसेच यामुळे ऑबस्ट्रॅक्टिव्ह स्लीप अॅपनियाची समस्या वाढू शकते. (Health)
भरपूर पाणी असणारे पदार्थ
रात्री भरपूर पाणी असलेले पदार्थ खाल्ल्याने तुमची झोप उडू शकते. यामुळे तुम्हाला रात्री वारंवार लघवीला उठावे लागू शकते. त्यामुळे झोपण्याआधी ओवा, टरबूज आणि खीर यांसारखे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.