How to prevent Vitamin A deficiency: निरोगी राहण्यासाठी शरीरात जीवनसत्वे असणे गरजेचे आहे. त्यात ए जीवनसत्वे खुप महत्वाचे आहे. शरीरात याची कमतकता असल्यास कोणती लक्षणे दिसतात हे जाणून घेऊया.
व्हिटॅमिन ए अनेक महत्त्वपूर्ण शारीरिक कार्ये करते. डोळे, त्वचा, रोगप्रतिकारक शक्ती आणि पेशींच्या विकासासाठी हे आवश्यक आहे. व्हिटॅमिन ए च्या कमतरतेमुळे डोळ्यांच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यापैकी काही लक्षणे सहज ओळखता येतात. या लक्षणांवर वेळीच उपचार न केल्यास कायमचे अंधत्व येऊ शकते.