पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण अधिक; जाणून घ्या कारणे

पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये डोकेदुखीची व मायग्रेनचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत
Why Do Women Suffer More With Migraines?
Why Do Women Suffer More With Migraines?sakal
Updated on

मायग्रेन (Migraine) हा वारंवार उद्‍भवणारा गंभीर व डोके ठणकवणारा आजार आहे. जो कधी डोक्याच्या एका बाजूला किंवा दोन्ही बाजूंना जाणवतो. मायग्रेनच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. योग्य वेळी या आजाराचा उपचार केला पाहिजे. यातच पुरुषांच्या तुलनेत महिलांमध्ये डोकेदुखीची व मायग्रेनचे प्रमाण अधिक असल्याचे अनेक प्रकरणे समोर आली आहेत. (Why Do Women Suffer More With Migraines?)

संशोधकांच्या म्हणण्यानुसार 17 टक्के महिला मायग्रेनचा त्रास जाणवतो तर पुरुषांमध्ये हे प्रमाण 8.6 टक्के आहे. वैज्ञानिकांनी केलेल्या संशोधनानुसार 15 दिवसात 6 टक्के महिलांना डोकेदुखीचा त्रास जाणवतो. याउलट पुरुषांमध्ये हे प्रमाण 2.9 टक्के इतके आहे तर मायग्रेनचे प्रमाण याच्या दुप्पट आहे.

Why Do Women Suffer More With Migraines?
तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, कसे ओळखाल? जाणून घ्या लक्षणे

महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण अधिक असल्याचे कारणे -

महिलांमध्ये मायग्रेनचे प्रमाण अधिक असल्याचे एक प्रमुख कारण म्हणजे त्यांचे हार्मोनल आरोग्य. खरं तर, हार्मोनल आरोग्याशी संबंधित गडबडीमुळे महिलांना अधिक डोकेदुखीचा आणि मायग्रेनचा त्रास होतो .

तज्ज्ञांच्या मते महिलांच्या मायग्रेनमध्ये मेन्स्ट्रुअल सायकलची महत्त्वाची भूमिका असते. काही महिलांना पिरेडच्या काळात मायग्रेनचा त्रास होतो. पाळीच्या काळात प्रोजेस्टेरॉन आणि एस्टेरॉन हार्मोन्समधील चढउतार मायग्रेनला ट्रिगर करतात.

Why Do Women Suffer More With Migraines?
कोरोनाची चौथी लाट येतेय का? जाणून घ्या लक्षणे

लक्षणे -

  • सामान्यत: मायग्रेनचा झटका आल्यावर समोरचे न दिसणे, मळमळणे, ओकारी येणे, प्रकाश, आवाज, वास, स्पर्श सहन न होणे, चेहऱ्याला झिणझिण्या आल्यासारखे वाटणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

  • हा झटका चार तासांपासून ७२ तासांपर्यंत टिकू शकतो. त्यातही हा रोग अत्यंत कार्यशील वयोगटात म्हणजे २५ ते ५५ वयोगटांत जास्त आढळतो.

  • मायग्रेन हा डोके दुखीचाच एक प्रकार आहे. मायग्रेनध्ये व्यक्तीच्या डोक्याचा अर्धा भाग दुखतो. या डोके दुःखीचा परिणाम डोळ्यावर नजरेवरही होऊ शकतो.

  • मायग्रेन पीडित असलेले रुग्ण तीव्र . प्रकाश व मोठा आवाजाच्या बाबतीत अधिक सेन्सेटीव्ह असलेले पाहायला मिळते

Why Do Women Suffer More With Migraines?
पाठदुखीचा त्रास सतत छळतोय! करा घरगुती उपाय

जगात डायबिटिस व दमा या पेशंटांपेक्षाही मायग्रेनचे पेशंट अधिक प्रमाणात आढळतात. धक्कादायक बाब म्हणजे शाळकरी मुलांपैकी १० टक्के मुलांना मायग्रेनचा त्रास असतो. याचा अर्थ प्रत्येक वर्गात एक किंवा दोन मायग्रेनग्रस्त मुले असतात. पण, तरीही मायग्रेनविषयी फारशी जागृती नाही. सामान्य डोकेदुखी म्हणून याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात आणि केम‌स्टिकडून औषधे घेऊन तात्पुरता दिलासा मिळवतात पण मायग्रेन हा डोकेदुखीच्या पलिकडचा आजार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.