Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’चे 9 लाखांवर अर्ज मंजूर! जिल्ह्यातील स्थिती; अखेरच्या दिवशी अर्ज भरण्यासाठी तोबा गर्दी

Latest Jalgaon News : या योजनेचा अखेरचा दिवस असल्याने अनेक बंकांमध्ये महिलांनी केवायसी करण्यासाठी तर सीएससी सेंटरवर अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी आशा वर्कर यांनीही महिलांचे अर्ज भरले आहेत.
On Tuesday, the last day of application submission, there was a rush at the post office.
On Tuesday, the last day of application submission, there was a rush at the post office.esakal
Updated on

जळगाव : राज्य शासनाने मोठा गाजावाजा करून सुरू केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत जिल्ह्यात सुमारे १० लाख १ हजार ९२६ महिलांनी आजअखेर अर्ज केले आहेत. दुपारी तीनपर्यंत ९ लाख ९० हजार ६२३ महिलांचे या योजनेचे अर्ज मंजूर केल्याची माहिती या योजनेच्या समन्वय अधिकारी वनिता सोनगत यांनी दिली.

या योजनेचे ९८.८७ टक्के अर्ज मंजूर झाले आहेत. आज या योजनेचा अखेरचा दिवस असल्याने अनेक बंकांमध्ये महिलांनी केवायसी करण्यासाठी तर सीएससी सेंटरवर अर्ज भरण्यासाठी गर्दी केली होती. काही ठिकाणी आशा वर्कर यांनीही महिलांचे अर्ज भरले आहेत. (Ladki Bahin yojana application for 9 lakhs approved)

राज्य शासनाने राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी, त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करणे आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्याची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना २८ जून २०२४ ला मंजूर केली. या योजनेमार्फत राज्यातील २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना दर महिन्याला १ हजार ५०० रूपये असा आर्थिक लाभ ’डीबीटी’द्वारे देण्यात येत आहे.

असे असले तरी जिल्ह्यात सप्टेंबर २०२४ अखेर ९ लाख ७४ हजार ९५० महिलांनी या योजनेसाठी अर्ज केले होते. जिल्हा महिला व बाल कल्याण विभागाने त्यापैकी ९ लाख ६१ हजार महिलांची अर्ज मंजूर केले. यात विविध कारणांनी १३ हजार ९४२ अर्ज नामंजूर केले आहेत. (latest marathi news)

On Tuesday, the last day of application submission, there was a rush at the post office.
NMU News: सेंटर ऑफ एक्सलेंस इन जर्नालिझमची उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात निर्मिती! मंत्रिमंडळाची मान्यता; 25 कोटींचा निधी मंजूर

मात्र जिल्हा महिला बाल विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार केवळ ९ हजार ९७६ अर्ज ‘प्रोव्हिजनली नामंजूर’ होते. तर २ हजार ४५१ अर्ज पूर्णत: नामंजूर केले आहेत. ९ लाख ७३ हजार ४२६ महिलांना या योजनेचा लाभ दिला आहे. मंजूर अर्जाच्या ९९ टक्के महिलांना पैसे दिल्याचा दावा केला जात असला तरी अनेक महिलांना त्या योजनेच्या पैसे त्यांच्या बँक खात्यावर जमा झालेले नव्हते.

अनेकांना तांत्रिक अडचणी

महिलांनी अर्ज भरल्यानंतर त्यांना अर्ज मंजुरीचा मेसेज आला आहे. मात्र, काहींना त्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा झाल्याचा मेसेजही आला. मात्र ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला होता. त्या खात्यावर पैसे जमा झालेलेच नाही. रोज महिला त्याच बँकेत जावून पैसे जमा झाल्याचा मेसेज बँकेच्या अधिकाऱ्यांना दाखवितात. मात्र पैसे बँकेत आलेले दिसत नव्हते.

अशा अनेक महिलांच्या तक्रारी आहेत. ज्या बँकेचा खाते क्रमांक दिला त्याच बँकेत पैसे जमा होणे अपेक्षित असताना, पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला असताना पैसे जमा न होणे हे कोणत्या यंत्रणेचे अपयश आहे. यावर अद्यापही तोडगा निघाला नाही.

On Tuesday, the last day of application submission, there was a rush at the post office.
Jalgaon News : जिल्‍हा पोलिस दलाकडे स्निफर डॉगच नाही! मुंबई-हावडा मेल तपासणीसाठी अडचण; तांत्रिक साधनसामग्रीचा वापर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.