Navratri 2024 : नवरात्रोत्सवात दगडी दिव्यांची झाली विक्रमी विक्री; भाविकांसह मंडळांकडूनही खरेदी

Navratri 2024 : अखंड दीप प्रज्वलीत ठेवण्याची परंपरा असल्याने अनेकांनी दगडांपासून बनविलेल्या दिव्यांचा वापराला पसंती दिली आहे.
sales of stone lamps
sales of stone lamps esakal
Updated on

चाळीसगाव : शारदीय नवरात्रोत्सव सुरु असल्याने घरोघरी घटस्थापना करण्यात आली आहे. यासोबतच अखंड दीप प्रज्वलीत ठेवण्याची परंपरा असल्याने अनेकांनी दगडांपासून बनविलेल्या दिव्यांचा वापराला पसंती दिली आहे. नवरात्रोत्सव साजरी करणाऱ्या मंडळांकडूनही दगडी दिव्यांचा वापर होत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे या नवरात्रोत्सवात दगडी दिव्यांची चांगली विक्री झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. (sales of stone lamps during Navratri festival were also bought by devotees )

दगडी दिवे बनवण्यासाठी खाणीतील दगडांची आवश्यकता असते. शहरी भागात हे दगड सहसा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे मराठवाडा, विदर्भातून हे दगड आणले जातात. त्यातच पावसाळ्यामुळे बऱ्याच खाणी बंद असल्यामुळे दगडांचा पुरवठा घटला असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. दिवा बनवताना त्यावर छिनी व हातोडीने योग्य ताकदीने घाव घालावे लागतात. खराब हवामानात तर विशेष काळजी घ्यावी लागते. (latest marathi news)

sales of stone lamps
Navratri 2024 : नववी माळ कामात यश देऊन भक्तांचं भलं करणारी माता सिद्धिदात्री

हवेतील आर्द्रतेचाही दगडांवर परिणाम होतो. बऱ्याचदा दगडावर वातावरणाचा परिणाम झाल्यामुळे थोडी जास्त ताकद लागली तरी दगड दोन भागांत विभागतो. मोठा दिवा तयार करण्यासाठी दोन ते अडीच तासांचा तर लहान दिवा बनवण्यासाठी एक ते दीड तास लागतो. दिव्यांवर नक्षीकाम करायला जास्तीचे एक ते दोन तास लागतात, असेही विक्रेत्यांनी सांगितले.

बाजारात लगबग...

पितृपक्षात सर्वसाधारपणे खरेदी करणे टाळले जाते. त्यामुळे ग्राहकांनी बाजारपेठेत पाठ फिरवली होती. मात्र, नवरात्रोत्सवासाठी लागणाऱ्या वस्तूंच्या, साहित्यांच्या खरेदीसाठी लगबग दिसून आली. पंधरा दिवसांच्या विश्रांतीनंतर ग्राहकांची पावले बाजारात वळाल्याने विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. बाजारात यंदा शोभीवंत दिवे उपलब्ध झाले आहेत. काही ग्राहकांकडून दगडी दिव्यांची मागणी टिकून आहे.

sales of stone lamps
Navratri Festival 2024 : गुजराती हिंदी गीतांसोबत अहिराणीचा तडका! रिमझिम पावसातही दांडिया खेळण्यासाठी महिलांची तोबा गर्दी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.