Ladki Bahin Yojana : ‘लाडकी बहीण’च्या तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षाच; जामनेरला 2 हजारांवर अर्ज प्रलंबित

Ladki Bahin Yojana : ऑनलाइन दाखल केलेल्या अर्जांमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने हे सर्व अर्ज प्रलंबित अवस्थेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojanaesakal
Updated on

जामनेर : महाराष्ट्रातील महायुती सरकारची महत्त्वाकांक्षी योजना म्हणून चर्चेत असलेल्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेसाठी तालुकाभरातून आतापर्यंत ८० हजारांवर महिलांचे ऑनलाइन अर्ज शासनाकडे प्राप्त झाले असून, यातील सुमारे दोन हजारांवर ऑनलाइन दाखल केलेल्या अर्जांमध्ये काही तांत्रिक अडचणी असल्याने हे सर्व अर्ज प्रलंबित अवस्थेत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, दोन महिन्यांचे अनुदान मिळाल्यानंतर 'लाडक्या बहिणीं'ना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. (Waiting for third installment of Ladki Bahin Jamner application for 2 thousand is pending )

यापूर्वी १५ ऑगस्ट महिन्यादरम्यान अनुदानाचे वितरण झाले होते. गेल्या जुलै २०२४ पासून राज्य सरकारकडून घोषित करण्यात आलेल्या या योजनेत सहभागी होण्यासाठी बहुतांश विवाहित महिला आणि २१ वर्ष पूर्ण झालेल्या मुलींनीही मोठ्या प्रमाणात आपापपले अर्ज दाखल केले आहेत. यातील जवळपास ६० ते ६५ हजार अर्जदार पात्र ठरले असून, उर्वरित राहिलेल्यांचे आधार क्रमांक, केवायसी आदी तांत्रिक त्रुटींमुळे संबंधितांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही, असेही यावेळी सांगण्यात आले.

त्यामुळे ‘केवायसी’सह अन्य तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी अशा सर्व महिला वर्गांची गर्दी आता विविध बँकांमध्ये दिसून येत आहे. गेले दोन महिने राज्याचे मंत्री गिरीश महाजनांच्या शहरातील संपर्क कार्यलयात भावी लाभार्थी महिलांना अर्ज दाखल करण्याची व्यवस्था करून देण्यात आली होती. आता सर्व अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ऑनलाइन-ऑफलाइन अर्ज भरले किंवा स्वीकारले जात असल्याचेही या योजनेचे तालुकाध्यक्ष रवींद्र झाल्टे यांनी दिली. राज्य सरकारने या महिनाअखेर (सप्टेंबर) पर्यंत तिसऱ्यांदा मुदत वाढवून देण्यात आल्याचेही सुत्रांनी सांगितले. (latest marathi news)

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे बँकेत हेलपाटे,साडेअकरा लाख महिला पात्र : तिसऱ्या हप्‍त्याच्या प्रतीक्षेत

लाभार्थी महिलांचे अनुदानाकडे लक्ष

धानोरा (ता. चोपडा) : दोन महिन्यांचे अनुदान मिळाल्यानंतर 'लाडक्या बहिणीं'ना आता तिसऱ्या हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे. यापूर्वी १५ ऑगस्ट महिन्यादरम्यान अनुदानाचे वितरण झाले होते. सप्टेंबर महिना संपत आल्याने आता तिसऱ्या महिन्याच्या अनुदानाकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागले आहे. राज्य शासनाने जून महिन्यात राज्यातील महिलांसाठी 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना लागू केली आहे.

या योजनेंतर्गत दरमहा पात्र महिलेला १५०० रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेतील काही अटी कमी करत, राज्य शासनाने ही योजना अधिकाधिक सुलभ करण्याचा प्रयत्न केला आहे. परिणामी, या योजनेसाठी नोंदणी करण्यांची संख्या वाढत आहे. ज्या महिलांचे आधार सिडिंग झालेले नव्हते, त्यालाही गती देत बहुतांशी महिलांची बँक खाती आधारशी जोडली गेली असून, त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहेत. त्यामुळे बँकेत महिला मोठी गर्दी करीत आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे 50 हजार अर्ज अपात्र; तिसरा हप्ता

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.