Majha Ladka Bhau Yojana : ‘माझा लाडका भाऊ योजने’साठी आता तरुण रांगेत

Jalgaon News : ‘माझा लाडका भाऊ' योजनेचे अर्ज भरण्यासाठी तरुणांची सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे.
Majha Ladka Bhau Yojana
Majha Ladka Bhau Yojanaesakal
Updated on

जळगाव : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. त्यानंतर आता शिक्षण घेणाऱ्या तरुणांठी ‘माझा लाडका भाऊ योजना’ शासनाने सुरू केली आहे. त्या योजनेचे अर्ज भरण्यासाठी तरुणांची सेतू सुविधा केंद्र, आपले सरकार केंद्रांवर गर्दी दिसून येत आहे. (Young people now lining up for Majha Ladka Bhau Yojana)

Majha Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana : ‘लाडक्या भावा’ला मिळणार विद्यावेतन;बारावी उत्तीर्ण, पदवीधरांसाठी योजना

शिक्षण सुरू असलेल्या, सुशिक्षित बेरोजगारांसाठी ही योजना आहे. या योजनेत ठरवून दिलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार मानधन दिले जाणार आहे. त्यात इयत्ता बारावी, पदवी आदींचा सामावेश आहे. या योजनेसाठी शैक्षणिक पात्रता पूर्ण केल्याचा अर्ज, बायोडेटा, जात प्रमाणापत्र, डोमासाईल प्रमाणपत्र, जन्म दाखला, आधार कार्ड, स्वत:चा पासपोर्ट फोटो, असे कागदपत्रे आवश्‍यक आहेत. ही कागदपत्रे घेऊन संबंधित तरुण सीएससी सेंटर, आपले सरकार केंद्र, सेतू सुविधा केंद्रावर गर्दी करीत आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी अनेक अडचणी येत असल्या तरीही या अडचणी दूर करून महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी मोठ्या प्रमाणात अर्ज भरून घेतले जात आहेत. राज्यातील महिलांची आर्थिक अडचण दूर करताना राज्यातील बेरोजगार तरुणांसाठीही शासनाने ‘युवा कार्य प्रशिक्षण योजना’ कार्यान्वित केली आहे. त्याला ‘माझा लाडका भाऊ’ योजना, असे नाव देण्यात आले आहे.

Majha Ladka Bhau Yojana
Ladka Bhau Yojana: 'लाडक्या भावां'साठी सरकारी तिजोरीवर येणार 5,500 कोटींचा भार; जाणून घ्या योजनेची वैशिष्ट्ये

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.