ladki bahin
ladki bahin

Sindhudurga Shivsena: लाडकी बहीण शोधा अन् योजना महाराष्ट्राच्या घराघरांत पोहोचवा

Ladki bahin Yojna sindhudurga: ‘लाडकी बहीण’ घराघरांत पोहोचवा मीना कांबळी : सावंतवाडीत शिवसेना महिला आघाडी मेळावा
Published on

सावंतवाडी, ता. २९ : गावागावांतील प्रत्येक महिलांच्या हातात दीड हजार रुपये दर महिन्याला मिळायलाच हवेत आणि आता ते मिळूही लागले आहेत. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा ज्या महिलांना अद्याप लाभ मिळाला नाही, अशा महिलांचा शोध घ्या आणि त्यांना लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न करा. ही योजना महाराष्ट्रातील घराघरांत पोहोचायलाच हवी. या योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे झाल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या माध्यमातून महिलांचा सन्मान केला आहे, असे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला उपनेत्या मीना कांबळी यांनी येथे आज केले.

शिवसेना महिला आघाडीचा मेळावा सावंतवाडी येथे रवींद्र मंगल कार्यालयात आयोजित करण्यात आला. यावेळी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ मिळवून देणाऱ्या ५० महिलांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर शिवसेनेच्या महिला नेत्या तृष्णा विश्वासराव, जिल्हाप्रमुख अॅड. नीता सावंत-कविटकर, अनारोजीन लोबो, अर्चना पांगम, उत्कर्षा गावकर, सोनाली परब, यशश्री सौदागर, चेतना गडेकर, दिशा शेटकर, श्रध्दा बाविस्कर, भारती मोरे, शीतल हरमलकर, चैत्राली गावडे, निकिता परब, सपना नाटेकर, सुवर्णा नाईक, शर्वरी धारगळकर, आदी शिवसेना महिला आघाडीतील पदाधिकाऱ्यांसह जिल्हाप्रमुख अशोक दळवी, सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण राणे, नितीन मांजरेकर, गजानन नाटेकर, नंदू शिरोडकर, प्रचिती कुबल, तारामती सावंत, आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक अॅड. नीता सावंत यांनी केले. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या माध्यमातून ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेचा लाभ प्रत्येक घराघरांत मिळून दिला जात आहे. आता प्रत्येक भागात शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून या योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या महिलांना लाभ मिळवून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...