Vinesh Phogat disqualified: १०० ग्रॅम वजनाने 'सुवर्ण' स्वप्नभंग! विनेशला अपात्र ठरवणारा ऑलिम्पिकचा नियम आहे तरी काय?

Vinesh Phogat Missed olympic Medal: विनेश फोगटला स्पर्धेतून अपात्र ठरवण्यात आले आहे. ५० किलो वजनी गटाच्या अंतिम स्पर्धेत तिला खेळता येणार नाही. नेमकं काय घडलं?
Vinesh Phogat disqualified
Vinesh Phogat disqualifiedesakal
Updated on

Vinesh Phogat Disqualified Rule:

ऑलिंपिकमध्ये कुस्तीत ५० किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश करणाऱ्या विनेश फोगाटला बुधवारी सकाळी अपात्र ठरवण्यात आले. विनेशचे वजन १०० ग्रॅम जास्त भरल्याने विनेशला अपात्र ठरवण्यात आले आणि विनेशचं सुवर्ण पदकाचं स्वप्न भंगले.

रिओ, टोकियो आणि पॅरिस अशा सलग तीन ऑलिम्पिक खेळणारीही ही पहिलीच भारतीय महिला खेळाडू आहे. मंगळवारी तिने अंतिम फेरीत प्रवेश करून इतिहास रचला होता. पण, ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात कुस्ती फायनल गाठणाऱ्या पहिल्या महिला खेळाडूचा मान विनेश फोगाटकडून हिसकावला गेला आहे. ऑलिंपिकमध्ये वजनाबाबतचा नियम काय, ही चाचणी कधी केली जाते हे जाणून घेऊया.

Vinesh Phogat disqualified
Vinesh Phogat disqualified: विनेश फोगाटला अपात्र ठरवल्यानंतर कोणतं पदक मिळणार? नेमकं काय होणार?

वजन कमी करण्यासाठी विनेशनं काय केले? Vinesh Phogat Efforts To Reduce Weight

मंगळवारी रात्री विनेशचं वजन दोन किलो अधिक होते. वजन कमी करण्यासाठी विनेशने सर्वतोपरी प्रयत्न केले. चाचणीत फेल होऊ नये यासाठी तिने पाणी पिणेही बंद केले होते, असे इंग्रजी माध्यमांनी म्हटले आहे. विनेश रात्रभर झोपली नाही. वजन कमी करण्यासाठी ती रात्रभर सायकल चालवणे, धावणे, दोरीउड्या असे व्यायामप्रकार करत होती, असे सूत्रांनी इंडियन एक्स्प्रेस या वृत्तपत्राला सांगितले.

विनेश कुस्तीमध्ये ऐरवी ५३ किलो वजनी गटात खेळायची

विनेश कुस्तीमध्ये ऐरवी ५३ किलोच्या गटात खेळते. यंदा ती ५० किलोच्या गटात खेळत होती. विनेशची पहिली चाचणी मंगळवारी झाली तर दुसरी चाचणी बुधवारी सकाळी झाली. मंगळवारच्या चाचणीत तिचे वजन दोन किलो जास्त होते. मंगळवारी तिचे वजन ५० किलोपर्यंत असणे अपेक्षित होते. रात्रभर व्यायाम करून देखील विनेशचे वजन ५० किलोपेक्षा जास्त होते आणि शेवटी तिला अपात्र ठरवण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सकाळी तिचे वजन १०० ग्रॅमने जास्त होते. त्यामुळे तिला नियमानुसार अपात्र ठरवले गेले.

ऑलिंपिकमधील नियम काय? Wrestling Rules Olympic

कुस्तीच्या नियमानुसार, एखादा कुस्तीपटू कोणत्याही सामन्याच्या दिवशी वजन चाचणीत फेल झाला तर त्याला स्पर्धेतून वगळण्यत येते. यानुसार भारतीय ऑलिंपिक महासंघाने बुधवारी सकाळी विनेश अपात्र ठरल्याची माहिती माध्यमांना सर्वांनाच धक्का बसला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.