Paris Olympic 2024 : Mirabai Chanu दिवसाला उचलते १२,००० kg वजन; विराटला तिला 'मॅच' करण्यासाठी...

Paris Olympic 2024, Mirabai Chanu : भारताची स्ट्राँग वूमन मिराबाई चानू टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकाचे सुवर्ण पदकात रुपांतर करण्यासाठी पॅरिसमध्ये दाखल झाली आहे.
Paris Olympic 2024, Mirabai Chanu
Paris Olympic 2024, Mirabai Chanusakal
Updated on

Paris Olympic 2024 Mirabai Chanu Training - भारताचा ११७ खेळाडूंचा चमू पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकण्यासाठी सज्ज झाला आहे. भालाफेकपटू नीरज चोप्रा, बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधू, बॉक्सर लव्हलिना बोर्गोहेन आणि वेटलिफ्टर मिराबाई चानू यांच्यासह भारताच्या काही महत्त्वाच्या खेळाडूंकडून ऑलिम्पिकमध्ये पदकाची अपेक्षा आहे. चार वर्षांनी येणाऱ्या या स्पर्धेसाठी खेळाडू अहोरात्र मेहनत घेतात, परंतु स्पर्धेदरम्यान एक छोटीशी चूक किंवा ०.१ सेकंदाच्या फरकानेही खेळाडूंना पदकापासून वंचित रहावे लागलेले पाहिले गेले आहे. ही चूक होऊ नये यासाठी पॅरिसमध्ये दाखल झालेल्या १० हजारांहून अधिक खेळाडूंनी प्रचंड घाम गाळला आहे.

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत ४९ किलो वजनी गटात रौप्यपदक जिंकणारी वेटलिफ्टर मिराबाई चानू यांदा पदकाचा रंग सोनेरी करण्याच्या निर्धाराने पॅरिसमध्ये आली आहे. मणिपूरच्या इंफाळ शहरापासून ३० किलोमीटर दूर असलेल्या नाँगपोक काकचिंग गावात जन्मलेल्या मिराबाईचा ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास खडतर आहे. १२ वर्षी तिच्या ताकदीची घरच्यांना ओळख झाली. घरासाठी लागणाऱ्या सरपणाचा भलामोठा गठ्ठा ती सहज उचलायची. तिच्या या ताकदीमुळेच तिने वेटलिफ्टिंगची निवड केली. गावापासून दूर असलेल्या मणिपूर येथील साई केंद्रात सरावासाठी तिला अनेकदा ट्रक चालकांकडून लिफ्ट मागावी लागायची. त्यामुळेच ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर तिने सर्व ट्रक चालकांना घरी जेवायला बोलावले अन् त्यांच्या पाया पडून कृतज्ञता व्यक्त केली.

२०२२च्या राष्ट्रकुल स्पर्धेत मिराबाईने २०१ किलो वजन उचलून सुवर्णपदक नावावर केले होते. तिने वर्ल्ड चॅम्पियनशीप, आशियाई चॅम्पियनशीप, राष्ट्रकुल स्पर्धा, राष्ट्रकुल अजिंक्यपद स्पर्धा अशा अनेक स्पर्धांमध्ये अनेक पदकं जिंकली आहेत. पण, ही पदकं जिंकण्यासाठीची मिराबाईची मेहनतही तितकीच कठोर आहे आणि धोकाही अधिक आहे.

Paris Olympic 2024, Mirabai Chanu
Paris Olympic 2024 : शाकाहारींची 'बल्ले बल्ले'; मांसाहार खाणाऱ्यांचे वांदे! जाणून घ्या खेळाडूंसाठीचा Menu

मिराबाई चानूची मेहनत...

४ फुट ११ इंच उंची आणि ४९ किलो वजन असलेली मिराबाई तिच्या वजनापेक्षा २४४ पटीने जास्त भार उचलते. यात तिला गंभीर दुखापत होण्याचीही शक्यता असते. ESPN ने दिलेल्या आकडेवारीनुसार मिराबाई ९५ ते १३० किलो वजन उचलण्याचा ५ सेटमध्ये सराव करते आणि प्रत्येकी वजनाचे ती ५-५ सेट मारते. उदाहरण - ९५ किलोचे ५ सेट + १०० किलोचे ५ सेट + ११० किलोचे ५ सेट + १२० किलोचे ५ सेट + १३० किलोचे ५ सेट अशी ती एका स्क्वॉटमध्ये २७७५ किलो वजन उचलते.

स्नॅच, क्लिन अँड जर्क प्रकाराचा तिच्या सरावाचा विचार केल्यास ती दिवसाला १२००० किलो वजन उचलते. जे ५ मर्सिडिज जी वॅगनार किंवा १७ फुटांचा ट्रक याच्या बरोबरीचे आहे. विराट कोहलीला मिराबाई चानूच्या सरावाशी मॅच करण्याकरीता १.२ किलोच्या बॅटने दिवसाला १०००० चेंडूंचा सामना करावा लागेल. २०२३ मध्ये विराटने ३०७२ चेंडूंचा सामना केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.