Paris 2024 Olympics Opening Ceremony India - संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेणाऱ्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेचा उद्घाटन सोहळा मोठ्या थाटात पार पडला.. ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात प्रथमच उद्घाटन सोहळा स्टेडियममध्ये पार न पडता नदीच्या तीरावर झाला... खुल्या आसमंतात सीन नदीच्या तीरावर हा भव्यदिव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात १४० कोटी भारतीयांच्या नजरा शोधत होत्या त्या आपल्या ११७ खेळाडूंना.... पण, भारताच्या तुलनेत यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानचे पात्र ठरणाऱ्या खेळाडूंची संख्या फार कमी आहे. त्यांच्यापेक्षा बर्म्युडा, लिबेरीया, अलबानिया या देशांचे खेळाडू अधिक पात्र ठरले आहेत.
पी व्ही सिंधू आणि शरथ कमल हे अनुभवी यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे ध्वजवाहक होते आणि त्यांच्या हातातला तिरंगा डौलाने फडकलेला पाहून भारतीयांचा ऊर अभिमानाने भरून आला. ''उद्घाटन समारंभाला उपस्थित राहणे हा अत्यंत सन्मान आहे. सर्व क्रीडापटू येथे येण्यास उत्सुक आहेत, विशेषत: जे प्रथमच ऑलिम्पिक खेळणार आहेत. मी कधीही यापूर्वी उद्घाटन समारंभांना हजेरी लावली नाही, कारण आमच्या स्पर्धा दुसऱ्या दिवशी असायच्या. पण, मी आता फक्त खेळाडूंना हेच सांगतोय की हा क्षण जगा आणि त्याचा आनंद घ्या,''भारताचे चीफ दी मिशन गगन नारंग यांनी सांगितले.
२६ जुलै ते ११ ऑगस्ट या कालावधीत पार पडणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत पाकिस्तानच्या केवळ ७ खेळाडूंना पात्रता मिळवता आली आहे. फईका रियाज ( १०० मी.), अर्शद नदीम ( भालाफेक), गुल्फान जोसेफ ( १० मी. एअर पिस्तुल), घुलाम मुस्ताफा बशीर ( २५ मी. रॅपिड फायर पिस्तुल ), किश्मला तलात ( महिला १० मी. एअर पिस्तुल व २५ मी. पिस्तुल), मुहम्मद अहमद दुरानी ( २०० मी. फ्री स्टाईल) जेहनारा नबी ( २०० मी. फ्री स्टाईल) हे पाकिस्तानी खेळाडू यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाले आहेत. पाकिस्तानला ऑलिम्पिक स्पर्धा इतिहासात ३ सुवर्ण, ३ रौप्य व ४ कांस्य असे एकूण १० पदकं जिंकता आली आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.