मुंबई : भारतीय खेळाडूंनी पॅरिस ऑलिंपिकमध्ये सहा पदके पटकावली. यामधील तीन पदके ही नेमबाजी या खेळांमधून मिळाली. मनू भाकर हिने दोन, तर सरबज्योत सिंग व स्वप्नील कुसाळे यांनी प्रत्येकी एक पदक जिंकले. हाच धागा पकडून अभिनव बिंद्रा याने आपले मत व्यक्त करताना म्हटले की, भारतीय नेमबाजांनी यंदा ऑलिंपिकमध्ये ठसा उमटवला.