Vinesh Phogat: 'निर्णयाला उशीर झाल्यावर आपण सर्वच वैतागतो, पण...', विनेशचा निकाल लांबणीवर पडल्यानंतर अभिनव बिंद्राची पोस्ट

Vinesh Phogat CAS Verdict: पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवण्याविरुद्धच्या याचिकेवर क्रीडा लवादाने निकाल तिसऱ्यांदा लांबणीवर टाकला आहे.
Abhinav Bindra | Vinesh Phohat
Abhinav Bindra | Vinesh PhohatSakal
Updated on

Abhinav Bindra Post on Vinesh Phogat CAS Verdict Delay: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेदरम्यान भारताची कुस्तीपटू विनेश फोगट हिला अंतिम फेरीपूर्वी १०० ग्रॅम वजन जास्त असल्याने अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे तिला सुवर्ण पदकाचा सामनाही खेळता आला नाही.

विनेशने आधी योग्यपद्धतीने तीन सामने खेळून अंतिम फेरी गाठली होती. मात्र, अंतिम सामन्याच्या दिवशी तिचं वजन जास्त भरल्याचा फटका तिला बसला. तिला अपात्र ठरव्यानंतर तिने ज्या खेळाडूविरुद्ध उपांत्य फेरीत विजय मिळवला, त्या खेळाडूला अंतिम सामन्यात स्थान देण्यात आलं.

या सर्व प्रकरणाबाबत तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली होती. तिला किमान विभागून रौप्य पदक मिळावं यासाठी विनंती केली होती. या प्रकरणी सुनावणी झाली असून अद्याप निकाल आलेला नाही, गेल्या अनेक दिवसांपासून निकाल लांबणीवर पडत आहे.

Abhinav Bindra | Vinesh Phohat
Vinesh Phogat: 'नियम माहित नाही, पण तिला सिल्व्हर मेडल तरी...' मास्टर-ब्लास्टरनंतर आता गांगुलीचीही विनेशसाठी बॅटिंग
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.