Paris Olympic 2024 : क्रिकेटनंतर ऑलिंपिक, भारतीयांचे पर्यटन कायम; पॅरिसला जाण्यासाठी गर्दी वाढली, आरक्षणात ३० टक्के वाढ

क्रिकेट असो वा अन्य कोणतीही बहुराष्ट्रीय मोठी स्पर्धा असो, स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यास भारतीय नेहमीच पुढे असतात. या महिनाअखेरीस होत असलेल्या ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये जाण्यासाठी भारतीयांची लगबग सुरू झाली आहे.
after t20 cricket olympics Indian rush to Paris surges 30 percent increase in reservations
after t20 cricket olympics Indian rush to Paris surges 30 percent increase in reservationsSakal
Updated on

नवी दिल्ली : क्रिकेट असो वा अन्य कोणतीही बहुराष्ट्रीय मोठी स्पर्धा असो, स्पर्धेच्या ठिकाणी जाण्यास भारतीय नेहमीच पुढे असतात. या महिनाअखेरीस होत असलेल्या ऑलिंपिकसाठी पॅरिसमध्ये जाण्यासाठी भारतीयांची लगबग सुरू झाली आहे. आरक्षणात तब्बल ३० टक्के वाढ झाल्याची माहिती ऑनलाईन निवास होस्टिंग प्लॅटफॉर्म असणाऱ्या एअरबिएनबी कंपनीने दिली आहे.

स्पर्धेच्या निमित्ताने पर्यटनाला भारतीयांचे नेहमीच प्रधान्य असते. त्यामुळे ऑलिंपिकसाठी केवळ पॅरिसच नव्हे तर फ्रान्समधील नाइस, ऑबरविलियर्स, कोलंब्स आणि सेंट-ओएन-सुर-सीन या ठिकाणांसाठीही मागणी वाढली आहे. असे एअरबिएनबी या कंपनीने आपल्या पत्रकात म्हटले आहे. १ जानेवारी २०२३ ते ३१ मार्च २०२४ या तीन महिन्यांत झालेल्या बुकिंगच्या आकडेवारीनंतर `एअरबिएनबी`ने ही माहिती उघड केली.

पॅरिसमध्ये ऑलिंपिकमधील मुख्य खेळ होणार आहेत, पण कोलंब्स शहरात हॉकी, शाटोरु येथे नेमबाजी, तर सेंट ओएन येथे फुटबॉलचे सामने होणार आहेत. लियॉन, नॅन्टेस, नाइस आणि बोर्डो ही फ्रान्समधील ठिकाणे पर्यटनासाठी प्रसिद्ध आहेत.

१६० देशांतील पर्यटकांनी पॅरिसमधील आपल्या मुक्कामाची ऑनलाईन नोंदणी अगोदरच केलेली आहे. ऑलिंपिक स्पर्धा २६ जुलै ते ११ ऑगस्टदरम्यान होत आहे. पॅरिसमधील निवासाच्या रकमेत गतवर्षीच्या तुलनेत पाच पट वाढ झाल्याचेही एअरबिएनबी यांनी म्हटले आहे.

ऑनलाईन सर्चमध्ये पॅरिस सर्वात वरच्या क्रमांकावर राहिले आहे. त्यात ४० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या शहराची माहिती मिवळण्यापासून येथील निवासाची व्यवस्था कशी होऊ शकेल याचा शोध घेतला जात आहे.

after t20 cricket olympics Indian rush to Paris surges 30 percent increase in reservations
T20 World Cup जिंकल्यानंतर आठवड्याने बुमराहने शेअर केला विराटच्या आवजातील 42 सेंकदाचा Video; कॅप्शननेही जिंकली मनं

ऑनलाईन आरक्षण करणाऱ्या देशांत आशियाई देश पुढे आहेत. त्यात चीन, हाँगकाँग आणि जपान आघाडीवर आहेत, परंतु सर्वात पुढे भारत असून त्यांचा वाटा ३० टक्के एवढा आहे. यावरून भारतीय पर्यटक किती उत्सुक असतात, हे स्पष्ट होते, असे एअरबिएनबी कंपनीचे भारत, दक्षिणपूर्व आशिया, हाँगकाँग आणि तैवान विभागाचे सरव्यवस्थापक अमनप्रीत बजाज यांनी सांगितले.

विश्वकरंडकलाही झाली होती गर्दी

नुकत्याच झालेल्या टी-२० विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीयांनी अमेरिकेतील भारताच्या सामन्यांसाठी अशीच गर्दी केली होती. वेस्ट इंडीज बेटांवरील प्रवास जिकरीचा असतो. बरेच अडथळे येत असतात. तरीही भारताच्या सामन्यांसाठी अनेक जणांनी प्रवास केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.