Paris Olympic 2024 : पुरुष असल्याचा आरोप झालेली बॉक्सर इमाने खलिफ सुवर्ण जिंकणार? फायनलमध्ये केला प्रवेश

Algerian boxer Imane Khelif Paris Olympic 2024 : लिंग वाद प्रकरण बाजूला सारत अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलिफ पॅरिस ऑलिंपिकमधील महिला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकासाठी लढणार आहे.
Algerian boxer Imane Khelif reaches Paris Olympic final
Algerian boxer Imane Khelif reaches Paris Olympic finalsakal
Updated on

Paris Olympic 2024 : लिंग वाद प्रकरण बाजूला सारत अल्जेरियाची बॉक्सर इमाने खलिफ पॅरिस ऑलिंपिकमधील महिला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदकासाठी लढणार आहे. उपांत्य लढतीत तिने थायलंडच्या जान्जाएम सुवान्नाफेंग हिच्यावर सहज मात केली.

महिलांच्या वेल्टरवेट गटात खेळणारी खलिफ ही दोन बॉक्सरपैकी एक आहे ज्यांना गतवर्षी आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग असोसिएशनने (आयबीए) लिंग पात्रता चाचणीत अपयश आल्याच्या कारणास्तव जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतून अपात्र ठरविले होते.

Algerian boxer Imane Khelif reaches Paris Olympic final
Vinesh Phogat : दुखापतीच कारण सांगून माघार घेतली असती तर विनेश फोगाट जिंकली असती सिल्वर मेडल? जाणून घ्या नियम

ऑलिंपिकमधील उपांत्य लढतीत अल्जेरियन बॉक्सरला जोरदार पाठिंबा लाभला. फ्रेंच ओपन टेनिससाठी वापरण्यात येणाऱ्या कोर्ट फिलिप शात्रिएच्या छताखाली बॉक्सिंग लढती होत आहेत. खलिफने थायलंडच्या प्रतिस्पर्धीविरुद्ध वर्चस्व राखत एकमताच्या निर्णयाने विजय प्राप्त केला.

खलिफ प्रथमच ऑलिंपिकच्या बॉक्सिंग अंतिम फेरीत दाखल झाली आहे. तीन वर्षांपूर्वी ती टोकियो ऑलिंपिकमध्ये उपांत्यपूर्व फेरीत गारद झाली होती. सुवर्णपदकाच्या लढतीत तिच्यासमोर चीनच्या लियू यँग हिचे आव्हान आहे. अल्जेरियाला ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदकाची प्रथमच संधी आहे.

Algerian boxer Imane Khelif reaches Paris Olympic final
Vinesh Phogat : विनेशची Love Story! रेल्वेत प्रेम, एअरपोर्टवर प्रपोज, लग्नात अष्टपदी; कोण आहे सोमवीर राठी?

स्वप्नपूर्तीचे ध्येय

२५ वर्षीय खलिफ म्हणाली की, ‘‘माझे लक्ष केंद्रित आहे. मी येथे चांगल्या कामगिरीसाठी आणि स्वप्नपूर्तीसाठी आले आहे. अंतिम लढतीत मी सर्वस्व वाहून खेळेन.’’ आयबीएने अपात्र ठरविण्यापूर्वी गतवर्षीच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतही खलिफने सुवान्नाफेंग हिला एकमताच्या निर्णयावर हरविले होते. पॅरिसमध्ये मिळणाऱ्या पाठिंब्याबद्दल खलिफने आनंद व्यक्त केला. ती म्हणाली की, ‘‘येथे आलेल्या अल्जेरियातील सर्व लोकांप्रती मी आभारी आहे.’’

महिला असली, तरी खूपच ताकदवान

उपांत्य लढत हरल्यानंतर सुवान्नाफेंग हिने खलिफसंदर्भात वादावर थेट भाष्य करणे टाळले. ‘‘तिच्याबद्दल मी बातम्यांत ऐकले आहे; पण त्याचा मी पाठपुरावा केलेला नाही,’’ असे थायलंडची बॉक्सर म्हणाली. ती पुढे म्हणाली की, ‘‘ती महिला आहे, तरीही खूपच ताकदवान आहे. मी वेगाचा वापर करण्याचा प्रयत्न केला; पण प्रतिस्पर्धी ताकदीत खूपच सरस ठरली.’’

Algerian boxer Imane Khelif reaches Paris Olympic final
Vinesh Phogat Retirement : 'तू हरली नाही तुला हरवलं...' विनेश फोगाटने निवृत्ती घेतल्यानंतर बजरंग पुनियाच्या ट्विटनं खळबळ

लिंग वादाच्या केंद्रस्थानी

ऑलिंपिक स्पर्धेत महिला बॉक्सिंग लढती गतआठवड्यात सुरू झाल्यानंतर इमाने खलिफ वादाच्या केंद्रस्थानी राहिली. इटलीच्या अँजेला कारिनी हिच्याविरुद्ध तिची लढत फक्त ४६ सेकंद टिकली. आयुष्य जपायचे आहे, असे म्हणत इटालियन बॉक्सरने लढत सोडून दिली. गतवर्षी आयबीएने अपात्र ठरविले असतानाही ऑलिंपिकसाठी खलिफ व तैवानची बॉक्सर लिन यू-टिंग याला पात्रता बहाल केल्याबद्दल मोठ्या प्रमाणात वादविवाद झाले. आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक कमिटीने (आयओसी) आयबीएला आर्थिक, प्रशासन, नैतीकता, पंचगिरी आणि न्याय याविषयी चिंतेमुळे निलंबित केले आहे. आयओसीने दोन्ही बॉक्सरना सहभागाची परवानगी देत निर्णयाचे जोरदार समर्थनही केले. आयओसी अध्यक्ष थॉमस बाक यांनी सांगितले की, ‘‘त्या महिला आहेत यात कधीही शंका नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.