Pravin Jadhav: आर्चरीपटू प्रवीण जाधवला ५० लाखांचे साहाय्‍य; ऑलिंपिकसाठी १२ खेळाडूंना सहा कोटी रुपये

6 crore rupees for 12 athletes for Olympics: ऑलिंपिक स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धेची तयारी करण्यासाठी यापूर्वी मिशन ऑलिंपिक योजनेतून खेळाडूंना अर्थ साहाय्य देण्यात येत होते.
Pravin jadhav
Pravin jadhavsakal
Updated on

सातारा - पॅरिस (फ्रान्स) येथील ऑलिंपिक व पॅरा ऑलिं‍पिकमध्‍ये उज्‍ज्‍वल कामगिरी करण्यासाठी महाराष्ट्रातील १२ खेळाडूंना प्रोत्साहन (आर्थिक साहाय्य) म्हणून राज्य शासनाने प्रत्येकी ५० लाख रुपये असे एकूण सहा कोटी रुपये देण्याचे निश्‍चित केले आहे. मिशन लक्ष्यवेध योजनेच्या माध्यमातून हे आर्थिक साहाय्य द्यावे, असा निर्णय नुकताच शासनाने घेतला आहे. या १२ खेळाडूंमध्ये सातारा जिल्ह्यातील आर्चरी खेळाडू प्रवीण जाधव याचा समावेश आहे.

ऑलिंपिक स्पर्धेत राज्याचे प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंना ऑलिंपिक स्पर्धेची तयारी करण्यासाठी यापूर्वी मिशन ऑलिंपिक योजनेतून खेळाडूंना अर्थ साहाय्य देण्यात येत होते. आता मिशन लक्ष्यवेध योजनेअंतर्गत मिशन ऑलिंपिक योजनेचे समायोजन करण्यात आले आहे.

क्रीडा विषयक तंत्रशुद्ध प्रशिक्षण, दर्जेदार पायाभूत सुविधा, सराव व प्रशिक्षणासाठी पुरेसे साहित्य, प्रशिक्षणाचा कृती आराखडा, खेळाडूंच्या सकारात्मक मानसिकतेसाठी मानसोपचार तज्ज्ञांचे मार्गदर्शन आदी बाबी खेळाडूंना मिळाव्यात, यासाठी मिशन लक्ष्यवेध ही महत्त्वाकांक्षी योजना राज्यात राबविण्यात येत आहे.

त्यानुसार या योजनेतून साताऱ्याच्‍या प्रवीण जाधवसह अविनाश साबळे (ॲथलेटिक्स), चिराग शेट्टी (बॅडमिंटन), विष्णू सर्वानंन (सेलिंग), स्वप्नील कुसाळे (शूटिंग), सर्वेश कुशारे, आभा खटुआ (ॲथलेटिक्स), मानसी जोशी, सुकांत कदम, भाग्यश्री जाधव, सुयश जाधव, सचिन खिलारे (पॅरा ॲथलेटिक्स) यांना ऑलिंपिक व पॅराऑलिंपिक स्पर्धेच्या तयारीसाठी ५० लाख रुपयांचा निधी दिला जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.