Arshad Nadeem's Mother on Neeraj Chopra: पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत गुरुवारी पुरुषांच्या भालाफेकीची अंतिम फेरी पार पडली. यामध्ये पाकिस्तानच्या अर्शद नदीमने सुवर्णपदक जिंकले, तर नीरज चोप्राने रौप्य पदक पटकावले. ग्रेनडाचा अँडरसन पीटर्सने कांस्य पदक जिंकले.
दरम्यान, या स्पर्धेनंतर भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशातून नदीम आणि नीरज यांचं कौतुक होत आहे. या खेळाडूंच्या आईंनीही दोघांचं कौतुक केलं आहे. नीरजची आई सरोज देवी यांनी म्हटलं होतं की 'आमच्यासाठी नीरजच रौप्य पदकही सुवर्ण पदकासारखंच आहे. ज्या अर्शदने सुवर्ण जिंकलं, तोही आमच्या मुलासारखाच आहे.'