Paris Olympic 2024: ऐतिहासिक ऑलिंपिक उद्घाटनच्या काही तासांपूर्वीच पॅरिस रेल्वेवर 'हल्ला'

Arson attacks target France train network: ऑलिंपिक उद्घाटन काही तासांवर असताना पॅरिसमधील ट्रेन नेटवर्क टार्गेट करण्यात आले आहे.
Arson attacks target France train network
Arson attacks target France train networkSakal
Updated on

Arson attacks target France train network: अख्ख्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या ऑलिंपिक स्पर्धेचे उद्घाटन होण्याच्या काही तास अगोदर फ्रान्सला धमकवण्याचा, तसेच दहशतवाद पसवण्याचा प्रयत्न झाला. स्पर्धेच्या ठिकाणापासून दूरवर जाळपोळ करण्यात आली आणि त्याचा फटका फ्रान्समधील हायस्पिड ट्रेन नेटवर्क ठप्प झाले. ही हायस्पिड ट्रेन फ्रान्समधील सर्वात व्यग्र असलेली ट्रेन लाईन आहे.

या ऑलिंपिकसाठी पॅरिस शहरात अभूतपूर्व पोलिस बंदोबस्त आहे. अतिशय कडक सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे. हजारो पोलिस आणि सुरक्षा अधिकारी तैनात आहेत; त्यामुळे लॉकडाऊनसारखी स्थिती निर्माण झालेली आहे. याचा फायदा घेऊन पॅरिस शहराच्या दूरवर तोडफोड आणि जाळपोळीचे प्रकार करण्यात आले.

या हल्लेखोरांनी ट्रेनच्या सिग्नल यंत्रणेची तोडफोड केली. पॅरिस शहराच्या पश्चिम, उत्तर भागाकडे जाणाऱ्या रेल्वे लाईन्सही खराब करण्याचा प्रयत्न केला. पॅरिस-मार्सेल या लाईनवरही हल्ल्याचा प्रयत्न तेथे असलेल्या पोलिसांनी उधळून लावला, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

Arson attacks target France train network
Paris Olympic Schedule: 18 दिवस, 117 खेळाडू अन् 16 खेळ... भारतीय खेळाडूंच्या महत्त्वाच्या सामन्यांचं संपूर्ण शेड्युल

रेल्वे लाईन्सवर आणि सिग्नल यंत्रणेवर केलेल्या या हल्ल्यामुळे हजारो प्रवासी रेल्वे स्थानकांवर अडकले परिणामी प्रत्येक स्थानावर अभूतपूर्व गोंधळ उडाला होता.

या हल्ल्याची जबाबदारी अजून कोणी स्वीकारलेली नाही; परंतु कट्टर डावे अतिरेकी किंवा पर्यावरण कार्यकर्त्यांपैकी कोणाचा तरी हात असल्याचा संशय सुरक्षा अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. कोणाचाही हात असला, तरी हे गुन्हेगारी कृत्य आहे, असे मत फ्रान्सचे परिवहन मंत्री पॅट्रिस व्हेरग्रीएट यांनी व्यक्त केले.

उद्घाटन सोहळा काही तासांवर आलेला असताना करण्यात आलेला हा हल्ला नियोजित होता. त्यांनी संधी साधली, अशीही टीका करण्यात येत आहे.

ऑलिंपिकच्या आजवरच्या इतिहासात कधी झाले नाही, असे खुल्या आसमंतात उद्घाटन आहे. ऐतिहासिक सीन नदीच्या तीरावर ३ लाख प्रेक्षकांची व्यवस्था करण्यात आली आहे. बोटींतून खेळाडूंचे संचलन हा संपूर्ण जगासाठी आगळावेगळा सोहळा ठरणार आहे.

Arson attacks target France train network
Paris Olympic 2024 : आली खेळ घटी समीप... सीन नदीच्या तीरावर होणाऱ्या पॅरिस ऑलिंपिक उद्घाटनाची उत्सुकता

रेल्वे अधिकाऱ्यांनी दूरवर जाणाऱ्या नागरिकांनी आपापला पुढचा प्रवास रद्द करावा, अशा सूचना तातडीने केल्या. रेल्वे स्थानकांवर येऊ नये, असेही त्यांनी कळवले. आम्ही दुरुस्तीची कामे तातडीने हाती घेतली आहेत; परंतु सर्व लाईन्स पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागतील, असे कळवले. स्थानकांवर थांबवण्यात आलेल्या रेल्वे पुन्हा यार्डात पाठवण्यात आल्या.

या हल्ल्यामुळे झालेल्या गोंधळाचा ८ लाख प्रवाशांना फटका बसला. यात ऑलिंपिकच्या उद्घाटनाला जाणारे तसेच वीकएंडमुळे पॅरिसच्या बाहेर जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. दुरुस्तीच्या कामासाठी रेल्वेचा हजारोंचा स्टाफ कामाला लावण्यात आला आहे.

हा हल्ला योगायोगाने नाही, तर ऑलिंपिकच्या पार्श्वभूमीवर फ्रान्सला अस्थिर करण्यासाठी करण्यात आला, असे पॅरिस विभागाचे अध्यक्ष व्हॅलेरी पेक्रेसे म्हणाले.

Arson attacks target France train network
Paris Olympic 2024 : दोन अंकी पदकांची अपेक्षा; नीरज चोप्रा ते निखत; कोण मिळवणार भारतासाठी पदके?

उद्घाटनासाठी अशी आहे सुरक्षा

उद्घाटन सोहळा आगळावेगळा आणि बंदिस्त स्टेडियममध्ये नसल्यामुळे फ्रान्सचे ४५ हजार पोलिस, १० हजार सैनिक, २ हजार खासगी सुरक्षारक्षक तैनात केले आहेत. तसेच सीन नदीच्या किनारी असलेल्या प्रत्येक इमारतीवर स्नायपर ठेवण्यात आले आहे.

खेळाडूंनाही फटका बसणार

स्पर्धेतील सामने आठ वेगवेगळ्या स्टेडियममध्ये होणार आहेत. त्यातील अमेरिका बास्केटबॉल संघ पॅरिसमध्ये निवासासाठी आहे; परंतु बास्केटबॉलचे सामने पॅरिस शहराच्या उत्तर भागातील स्टेडियममध्ये असल्यामुळे त्यांना या रेल्वेतून प्रवास करायचा होता. या घटनेनंतर आता प्रत्येक स्थानकाची सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे.

Crossword Mini:

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.